top of page
Групи
Наразі немає жодної групи
Після створення групи вона з’явиться тут.
-
वास्तुशांतिदिनी सत्यनारायणपूजा करणे कितपत योग्य आहे? Should we perform Satyanarayan Puja on the occasion of Gruhapravesh Vastushanti? What does the shaastra say?उत्तर : शास्त्र असे सांगते- वास्तुशांतिदिनी सत्यनारायणपूजा करणे कितपत योग्य आहे? काही जण वास्तुशांतीस पर्याय म्हणून सत्यनारायणपूजा करतात. नवीन घरात काहीतरी धार्मिक कार्य व्हावे व त्यानिमित्ताने संबंधितांना नवीन घरी निमंत्रित करता यावे म्हणून सत्यनारायणपूजा केली तर ते सयुक्तिक ठरेल. पण सत्यनारायणपूजा केल्यावर वास्तुशांती करण्याची आवश्यकता नाही असे कोणी प्रतिपादन करू लागला तर ती अज्ञानमूलक गैरसमजूत ठरेल. काही जण विधिपूर्वक वास्तुशांती करून त्या दिवशीच सत्यनारायणपूजा करण्याचा आग्रह धरतात. वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायणपूजा केल्यास त्यापासून निराळे असे कोणते लाभ मिळतील असे मुळीच नाही. कारण सत्यनारायणाच्या वेळी मांडले जाणारे अष्टलोकपाल व नवग्रह वास्तुशांतीच्या वेळी ग्रहमखाच्या निमित्ताने आपोआपच पूजले जातात. शिवाय सत्यनारायणपूजेत ‘विष्णू' ही मुख्यदेवता असून ती वास्तुदेवतेच्या मानाने उच्चस्तरीय असल्यामुळे वास्तुशांतीच्या दिवशी कळत-नकळत विष्णुदेवतेला मुख्यत्व व वास्तुदेवतेला गौणत्व प्राप्त होते. ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्याच्या हस्ते आयोजित केलेल्या उद्घाटनसोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहिल्यास जो प्रसंग ओढवेल तोच प्रसंग वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायणपूजा ठेवल्यास ओढवू शकतो. शिवाय सत्यनारायण हा व्रतपूजेचा प्रांत आहे, तर वास्तुशांती हा याज्ञिकाचा प्रांत आहे. त्या दृष्टीने विचार केल्यास यज्ञकार्य आणि पूजाकार्य ह्यांमध्ये यज्ञकार्य हे श्रेष्ठ मानले जाते. पण यज्ञकार्याच्या दिवशी पूजाकार्य आयोजित केल्यास मुख्यत्व आणि गौणत्व ह्यांचे निकष कार्यासाठी घ्यावयाचे की देवतेसाठी घ्यावयाचे ह्याबद्दलही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ह्यासाठी सुवर्णमध्य म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम केवळ घरच्या लोकांपुरता मर्यादित ठेवून त्यानंतर सोयिस्कर दिवशी परिचितांना व संबंधितांना निमंत्रित करून सत्यनारायणमहापूजा आयोजित करावी. त्यामुळे मुख्यपक्षाने वास्तुशांतीही उत्कृष्ट पद्धतीने संपन्न होते व नंतर पूजेच्या निमित्ताने परिचितांनाही मान दिल्यासारखे होते.
-
Does PANDITJIPUNE serve internationally?Yes, PANDITJIPUNE provides services internationally.You can book our services worldwide. Experience in what promises to be a truly unique & unforgettable spiritual journey with our religious and astrological services,all with full devotion across the worldWe have international clients as well. We have priests almost in every Indian language. The website is availble in almost all languages in the world. We have an international payment gateway PAY PAL connected to the site with currency convertor enabling our overseas clients to book services and shop products online. Our whatsapp number is intnl +91 7875032009 or Drop an email to support@panditjipune.com You may contact us anytime. Book and experience in what promises to be a truly unique and unforgettable divine journey with our devotional services,all with complete devotion and utmost faith,As well as you can DOWNLOAD OUR APP PANDITJIPUNE VIA LINK http://wix.to/8sANBzM?ref=mam GET PANDITJIPUNE ON Google Play Download on the App Store Join us on the App just click http://wix.to/8sANBzM?ref=mam Easily stay updated on the go. or Scan te code to download
-
वास्तुशांती' म्हणजे काय ? वास्तुशांतीची कोणकोणती अंगे आहेत?What is 'Vastushanti'? What are the Shubha Muhurts Auspicious days Dates and Timings for Vastushanti Gruhapravesh in 2024?What are the parts and components of Vaastu Shanti?What does Dharma Shastra say? How should Gruhapravesh be performed? 'VastuShanti Grihapravesh Dates December 2023 : 25,27. शास्त्र असे सांगते वास्तुशांती' म्हणजे काय ? वास्तुशांतीची कोणकोणती अंगे व उपांगे आहेत ? 'वास्तुशांती' हा विधी विविध अंगोपांगांनी संपन्न होतो. त्यांपैकी वास्तुशांतीच्या प्राथमिक गोष्टींमध्ये पुण्याहवाचनापर्यंतचे विधी येतात. त्यानुसार यज्ञमानाने प्रथम नूतनयज्ञोपवीतधारण, पंचगव्यमेलन व पंचगव्यप्राशन करावे. नंतर आचमन, प्राणायाम, देशकालनिर्देश, वास्तुशांतिसंकल्प, गणपतिपूजन इत्यादी करून पुण्याहवाचनास प्रारंभ करावा. पुण्याहवाचनामध्ये वरुणपूजन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध इत्यादी विधी येतात. पुण्याहवाचनानंतर आचार्यवरण (पुरोहिताची नियुक्ती) करावे. आचार्यवरण झाल्यानंतर पुरोहित; वास्तुपीठमांडणी, रेखाकरण, वास्तुप्रतिमेचे अग्न्युत्तारण व प्राणप्रतिष्ठा, देवता-ग्रह-अग्नी ह्यांची स्थापना, अन्वाधान व पूजा इत्यादी गोष्टी करून घेतात. त्यानंतर होमास प्रारंभ होतो. त्यामध्ये पहिली आहुती (वराहुती) गणपतीस द्यावयाची असते. ही आहती यजमानाने द्यावी. त्यानंतर द्रव्यत्याग होऊन पुढील आहुत्या नवग्रहांच्या अधिदेवता, पुरोहित देतात. त्यामध्ये अन्वाधानातील उच्चारानुसार नवग्रह, नवग्रहांच्या प्रत्यधिदेवता, क्रतुसाद्गुण्यदेवता, ऋतुसंरक्षकदेवता, शिख्यादिदेवता (४५) ह्यांचा होम झाल्यावर वास्तुदेवतेस कल्पोक्तद्रव्यांनी किमान एकशेआठ आहुत्या द्याव्यात. तथापि, वास्तू अत्यधिक विस्तीर्ण असेल तर अधिक संख्येने वास्तूच्या आहुत्या देणे हे केव्हाही चांगले. कल्पोक्तसंख्येने वास्तूला आहुत्या दिल्यानंतर वास्तुदेवतेस बेलफळाच्या किंवा बेलाच्या पानाच्या पाच आहुत्या द्याव्यात. शेवटी चरक्यादिदेवता (८) व इंद्रादिदेवता (८) ह्यांना कल्पोक्त द्रव्याने आहुत्या द्याव्यात. अशा रितीने होम संपन्न झाल्यानंतर स्विष्टकृत व प्रायश्चित्तहोम करावा. वास्तुशांतीदिवशी ग्रहमख असल्यामुळे ग्रहबलिदानदेखील करावयाचे असते. त्यानुसार ग्रहदेवता-वास्तोष्पति-क्षेत्रपालादिदेवता ह्यांच्यासाठी बलिदान करावे. बलिदानासाठी एका शिप्तरात (वेळूच्या टोपलीत) भाताचा बली करून त्यावर विविध कृष्णद्रव्ये घालावीत व तो बली यजमानासह सर्व कुटुंबीयांवरून ओवाळून तिठ्यावर ठेवावा. त्यानंतर पूर्णाहुती होऊन मुख्यहवनाचा विधी पूर्ण होतो. नंतर विभूतिधारण, अग्निप्रार्थना, स्थापितदेवता-उत्तरपूजन, यजमानावर कलशांतील जलाभिषेक, आचार्यदक्षिणाप्रदान करावे. त्यानंतर अग्निसमारोप करून आशीर्वादग्रहणापर्यंत अन्य कर्मे करावीत. अशा प्रकारे वास्तुशांतीचा मुख्यविधी संपन्न होतो. त्यानंतर ‘धरापूजन' करण्यात येते. त्या वेळी यजमानपत्नीने वास्तुनिक्षेपस्थानी धरादेवीची (भूमीची) पूजा करावी. पूजा केलेल्या ठिकाणी वास्तुनिक्षेप करण्यासाठी गर्ता (खड्डा) करून त्यामध्ये 'वास्तुनिक्षेप' केला जातो. वास्तुनिक्षेप हे वास्तुशांतीचे एक महत्त्वाचे उपांग आहे. वास्तुनिक्षेपासाठी करण्यात येणारा गर्ता गुडघाभर खोल असावा असे शास्त्र आहे. पण सद्यःकाली असे करणे गैरसोईचे ठरत असल्यामुळे किमानपक्षी छोटी पेटी (३ इंच लांब x २ || इंच रुंद x २ इंच खोल) बसेल एवढे उकरून त्या ठिकाणी वास्तुनिक्षेप करावा व ते स्थान योग्य तऱ्हेने झाकून घ्यावे. वास्तुप्रतिमा ठेवण्यासाठी औदुंबराच्या लाकडाची पेटी वापरतात. ह्या पेटीभोवती मनशिळीचे (हे एक प्रकारचे कीटकनाशक रसायन आहे) चूर्ण विखरून टाकले जाते. तसेच त्या ठिकाणी पाण्याशी संलग्न अशा अनेक वस्तू ठेवल्या जातात. त्यात शैवाल (शेवाळ)व समुद्रवाळू ह्यांचा समावेश होतो. 'शैवाल' ही पृथ्वीवरील आद्य वनस्पती तिच्यापासूनच उत्क्रांती होत होत वनस्पतिसृष्टीची निर्मिती झाली. शैवालाचे दूसरे पुढे अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच नव्याने फोफावते. वास्तुप्रतिमेबरोबर पंचरत्ने व पंचधातू हेदेखील ठेवण्यात येतात. रत्नांचा व धातूंचा जन्म पृथ्वीच्या पोटातून होत असतो. त्यामुळे रत्ने व धातू हे एका अर्थाने पृथ्वीचेच प्रतिनिधित्व करत असतात. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरकणी, नीलम, लसण्या इत्यादी रत्नांपैकी हव्या त्या पाच रत्नांचे तयार संच सराफकट्ट्यावर उपलब्ध होतात. तसेच तेथे चांदी, पितळ, कांस्य, तांबे, लोह अशा धातूंचे तुकडे किंवा सर्वांचा मिळून तयार केलेला पंचधातूचा तुकडाही उपलब्ध होऊ शकतो. वास्तुनिक्षेप झाल्यावर त्या जागी अंबील व भिजाणे (भिजवलेले हरभरे) ह्या वस्तू ठेवल्या जातात. ह्या सर्व वस्तू गारवा निर्माण करणाऱ्या आहेत. वास्तुनिक्षेप झाल्यानंतर पुढे त्या स्थानी कटाक्षाने स्वच्छता ठेवावी. त्या स्थानावर मनुष्याचा वावर होणार नाही वा अन्य काही निषिद्ध वस्तू तेथे ठेवल्या जाणार नाहीत ह्याची खबरदारी घ्यावी. तोरणबंधन हे वास्तुशांतीमधील दुसरे उपांग होय. कोणत्याही धार्मिक कार्याच्या ते वेळी मुख्य दरवाज्यावर आम्रवृक्षाच्या पानांचे तोरण बांधणे शुभदायक असून मंगलकार्याचे द्योतक असते. तोरणाच्या बाबतीत विविध प्रांतांत विविध रूढी प्रचलित आहेत. काही प्रांतांत यजमानाच्या बहिणीकडून किंवा सोयऱ्यांकडून तोरण आणण्याची प्रथा आहे. त्या वेळी तोरण आणणाऱ्यांचा वस्त्रादिकांनी सन्मान केला जातो. काही ठिकाणी हे तोरण वाजत-गाजत आणले जाते. वास्तुशांतीच्या दिवशी पुण्याहवाचनानंतर प्रथम पाच सुवासिनींकडून तोरणाची पूजा करून घेतात व नंतर ते दारावर बांधले जाते. वास्तुनिर्मिती होत असताना व निर्मितीची पूर्तता झाल्यावर नवीन वास्तूकडे पाहताना काही लोकांची 'नजर' लागण्याची शक्यता असते, अशी समजूत आहे. अर्थात, समजुतीस भक्कम वैज्ञानिक आधार नाही हे खरे असले तरी त्यामागे काहीतरी तथ्य आहे हे अनुभवांती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे नूतन वास्तूच्या दर्शनी सर्वांना दिसेल अशा जागी काळी बाहुली उलटी टांगण्याचा प्रघात आहे. वास्तुनिर्मिती होत असताना काळी बाहुली बांधलेली नसल्यास तोरणबंधनानंतर ती दर्शनी भागी उलटी टांगावी. सूत्रवेष्टन हे वास्तुशांतीमधील तिसरे उपांग होय. सूत्रवेष्टनामागे वास्तूची परिमिती • निर्धारित करणे हाच हेतू असतो. हे सूत्र तीन, पाच किंवा अकरा पदरांचे असावे. तीन ही संख्या सत्व रज तम ह्या त्रिगुण साठी • पाच ही संख्या पंचमहाभूताची तर अकरा ही संख्या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिये व मन ह्यांचे प्रतीक समजली जाते. ह्यामध्ये प्रथम तीन / पाच / अकरा सूतगुंड्या घेऊन त्यावर गुरुजींनी अभिषेक केल्यावर पाच सुवासिनींनी गंध, हळद-कुंकू, फुले वाहून त्या सूतगुंड्यांची पूजा करावी व त्या गुंड्या • किंवा पाच पदरी दोरा केल्यावर तो घराभोवती वेष्टन करावा. फ्लॅट असेल तर तो दोरा पुरुषमंडळींकडे सुपूर्त कराव्यात. पुरुष मंडळींनी त्या गुंड्यांचे पदर एकत्र करून तीन पदशी • दर्शनी भागावर व हाताला न येईल इतक्या उंचीवर छोटे खिळे (चुका) मारून त्यास लटकवून ठेवावा. त्या दरम्यान यजमानाने आठ द्रोण घेऊन त्यांत दही-भात घालून ते द्रोण घराच्या आठ दिशांना ठेवावेत. प्रत्येक द्रोण ठेवण्यापूर्वी द्रोणाखाली जमिनीत एक खिळा ठोकून मग त्यावर द्रोण ठेवावा. वास्तुशांतीच्या दिवशी घराच्या आठही दिशांना जमिनीत खिळे मारून क्षेत्रनिर्धारण केले जाते. गृहप्रवेश हे वास्तुशांतीचे थेट अंग नसले तरी वास्तुशांतीच्या दिवशी गृहप्रवेश असेल तर ते कर्मांगभूत अंग मानावे लागेल. वास्तविक वास्तुशांतिविधानानुसार वास्तुशांती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विधिवत गृहप्रवेश करावयाचा असतो. पण वास्तवात वास्तुशांतीपूर्वीच अनौपचारिकरीत्या गृहप्रवेश झालेला असतो. तथापि, वास्तुशांतीच्या दिवशी गृहप्रवेश योजला असल्यास पुरोहितांनी काढून दिलेल्या सुमुहूर्तावर औपचारिक गृहप्रवेश करावा. गृहप्रवेशाचे वेळी घरातील सर्वांनी घराबाहेर येऊन थांबावे. मुख्य यजमानाने आपल्या हातात देवाचे ताह्मण घेऊन उभे राहावे व त्याच्या पत्नीने प्रथेनुसार नारळ ठेवलेली जलपूर्ण कळशी कडेवर वा मस्तकावर घेऊन यजमानाच्या उजव्या बाजूस उभे राहावे. नंतर गुरुजींकडून विविध मंगलसूक्तांचा घोष होत असताना त्या दरम्यान घराच्या विस्ताराच्या मानाने एक, तीन वा अधिक संख्येने गृहप्रदक्षिणा कराव्यात. त्या वेळी चौघडा, सनई इत्यादी वाजंत्री वाजवण्याची प्रथा आहे. वाजंत्री नसेल तर झांज, टाळ, घंटा इत्यादी वाद्ये वाजवली तरी चालतात. वास्तूभोवती घंटावादन करत प्रदक्षिणा केल्यामुळे अनिष्ट शक्ती दूर पळतात. नंतर यजमानाने सपत्नीक पुढे होऊन अन्यजणांसह मुख्य प्रवेशद्वाराशी येऊन उभे राहावे व निर्धारित मुहूर्तावर यजमान व यजमानपत्नी ह्यांनी उजवा पाय उंबऱ्याच्या आत ठेवून गृहप्रवेश करावा. काही प्रांतांत त्या वेळी शंख