
श्री महालक्ष्मी ज्येष्ठागौरी आवाहन पूजन विसर्जन
- Vedmata Gayatri J & D Kendra
- 5 days ago
- 2 min read

श्री महालक्ष्मी ज्येष्ठागौरी आवाहन पूजन विसर्जन
महालक्ष्मी ध्यानं
ध्यायामि तां महालक्ष्मीं कर्पूरक्षोदपाण्डुराम् ।
शुभ्रवस्त्रपरीधानां मुक्ताभरणभूषिताम् ।।
पङ्कजासनसंस्थानां स्मेराननसरोरुहाम् ।
शारदेन्दुकलाकान्तिं स्निग्धनेत्रां चतुर्भुजाम् ।।
पद्मयुग्माभयवरव्यग्रचारुकराम्बुजाम् ।
अभितो गजयुग्मेन सिच्यमानां कराम्बुना ।।
अथ ज्येष्ठागौरी पूजन
ह्या अष्टमीसच ज्येष्ठादेवीपूजा सांगतो माधवीयांत-स्कंदपुराणांत "भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्या दिवशी ज्येष्ठा- नक्षत्रयुक्त रात्रि असेल त्या दिवशीं ज्येष्ठादेवीचें पूजन करावें.” ही अष्टमी ज्येष्ठानक्षत्रानें युक्त पूर्वा किंवा परा असेल ती घ्यावी. दोन दिवशीं ज्येष्ठानक्षत्रयोग असतां परा घ्यावी. पूर्वदिवशीं रात्रीस योग असतां पूर्वाच करावी. कारण, "नवमी- युक्त अष्टमीच करावी यांत संशय नाहीं. भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्या दिवशीं ज्येष्ठानक्षत्रयुक्त रात्रि असेल त्या दिवशीं ज्येष्ठादेवीचें पूजन करावें" असें तेथेंच सांगितलें आहे. याचा अपवाद- "ज्या दिवशीं मध्याह्नापुढें ज्येष्ठानक्षत्र अल्पहीं असेल त्या दिवशीं हविष्य व पूजा हीं करावीं. मध्याह्नांत न्यून असेल तर पूर्व दिवशीं करावी." हैं व्रत केवलतिथीस व केवलनक्षत्रावरही करण्याविषयीं सांगितलें आहे. त्यांत पहिलें केवल तिथीस करावें. दुसरें केवल नक्षत्रावर करावें. तें सांगतो - मत्स्यपुराणांत - "प्रतिवषर्षी करावयाचें जें ज्येष्ठादैवतव्रत तें तिथीस सांगितलें आहे. आणि प्रतिज्येष्ठानक्षत्रावर करावयाचें जें ज्येष्ठाव्रत तें केवल नक्षत्रावर सांगितलें आहे. पहिलें केवल तिथीसच करावें. आणि दुसरें केवल नक्षत्रावरच करावें." म्हणूनच मदनरत्नांत भविष्यांत नक्षत्रावर करण्याविषयीं सांगितलें आहे, तें असें- "भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्या दिवशीं ज्येष्ठा असेल त्या रात्रीस जागरण करून ज्येष्ठादेवीचें पुढील मंत्रानें पूजन करावें." दाक्षिणात्यलोक तर केवल नक्षत्रावरच करतात. हेमाद्रींत स्कांदांतही "भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्येष्ठानक्षत्र कोणत्याही दिवशीं असेल त्या दिवशीं ज्येष्ठादेवीचें पूजन करावें." तसेंच "अनुराधानक्षत्रावर ज्येष्ठादेवीचें आवाहन, ज्येष्ठानक्षत्रावर पूजन व मूलनक्षत्रावर विसर्जन करावें, असें हें त्रिदिनात्मक व्रत होय." पूजेचा मंत्र - "एह्येहि त्वं महाभागे सुरासुरनमस्कृते ॥ ज्येष्ठे त्वं सर्वदेवानां मत्समीपगता भव" यानें आवाहन करून "तामग्निवर्णा०" यानें पूजन करून "ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः ॥ शर्वायै ते नमस्तुभ्यं शांकर्यै ते नमो नमः ॥ ज्येष्ठे श्रेष्ठे तपोनिष्ठे * ब्रह्मिष्ठ सत्यवादिनि ॥ एह्येहि त्वं महाभागे अर्घ्य गृह्ण सरस्वति ॥” यानें अर्घ्य द्यावें.
श्री अष्टलक्ष्मी स्त्रोतम:
आदि:
लक्ष्मीसुमनस वन्दित सुन्दरि माधवि चंद्र सहोदरि हेममये ।मुनिगण वन्दित मोक्षप्रदायिनी मंजुल भाषिणि वेदनुते ।पङ्कजवासिनि देवसुपूजित सद-गुण वर्षिणि शान्तिनुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि परिपालय माम् ।
धान्य
लक्ष्मीअयिकलि कल्मष नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।क्षीर समुद्भव मङ्गल रुपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रित पादयुते ।जय जय हे मधुसूदनकामिनि धान्यलक्ष्मि परिपालय माम् ।
धैर्य
लक्ष्मीजयवरवर्षिणि वैष्णवि भार्गवि मन्त्र स्वरुपिणि मन्त्रमये ।सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनि शास्त्रनुते ।भवभयहारिणि पापविमोचनि साधु जनाश्रित पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि धैर्यलक्ष्मि सदापालय माम् ।
गज
लक्ष्मीजय जय दुर्गति नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।रधगज तुरगपदाति समावृत परिजन मंडित लोकनुते ।हरिहर ब्रम्ह सुपूजित सेवित ताप निवारिणि पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि गजलक्ष्मि रूपेण पालय माम् ।
सन्तान
लक्ष्मीअयि खगवाहिनी मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये ।गुणगणवारिधि लोकहितैषिणि सप्तस्वर भूषित गाननुते ।सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वन्दित पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि सन्तानलक्ष्मि परिपालय माम् ।
विजय
लक्ष्मीजय कमलासनि सद-गति दायिनि ज्ञानविकासिनि गानमये ।अनुदिन मर्चित कुङ्कुम धूसर भूषित वसित वाद्यनुते ।कनकधरास्तुति वैभव वन्दित शङ्करदेशिक मान्यपदे ।जय जय हे मधुसूदन कामिनि विजयक्ष्मि परिपालय माम् ।
विद्या
लक्ष्मीप्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि शोकविनाशिनि रत्नमये ।मणिमय भूषित कर्णविभूषण शान्ति समावृत हास्यमुखे ।नवनिद्धिदायिनी कलिमलहारिणि कामित फलप्रद हस्तयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि विद्यालक्ष्मि सदा पालय माम् ।
धन
लक्ष्मीधिमिधिमि धिन्धिमि धिन्धिमि-दिन्धिमी दुन्धुभि नाद सुपूर्णमये ।घुमघुम घुङ्घुम घुङ्घुम घुङ्घुम शङ्ख निनाद सुवाद्यनुते ।वेद पुराणेतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते ।जय जय हे कामिनि धनलक्ष्मी रूपेण पालय माम् ।अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।विष्णुवक्षःस्थलारूढे भक्तमोक्षप्रदायिनी ।।शङ्ख चक्र गदाहस्ते विश्वरूपिणिते जयः ।जगन्मात्रे च मोहिन्यै मङ्गलम शुभ मङ्गलम ।। इति श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम सम्पूर्णम ।
महालक्ष्मी अष्टक वाचण्याचे अनेक फायदे आहेत; याच नित्यनेमाने पठण केले तर आयुष्यातले सर्व आर्थिक संकट दूर होतात.
Comments