top of page
Loyalty
Earn points and turn them into rewards
- 01
Sign Up
Sign up as a member to start enjoying the loyalty program
- 02
Earn Points
Book a session
Get 10 points
Purchase a product
Get 1 point for every $1 spent
Order a plan
Get 1 point for every $1 spent
Sign up to the site
Get 50 points
- 03
Redeem Rewards
10% off all store products
10 Points = 10% off for all store products
10% off all bookings
10 Points = 10% off the lowest priced item in cart
All Products
-
वास्तुशांतिदिनी सत्यनारायणपूजा करणे कितपत योग्य आहे? Should we perform Satyanarayan Puja on the occasion of Gruhapravesh Vastushanti? What does the shaastra say?उत्तर : शास्त्र असे सांगते- वास्तुशांतिदिनी सत्यनारायणपूजा करणे कितपत योग्य आहे? काही जण वास्तुशांतीस पर्याय म्हणून सत्यनारायणपूजा करतात. नवीन घरात काहीतरी धार्मिक कार्य व्हावे व त्यानिमित्ताने संबंधितांना नवीन घरी निमंत्रित करता यावे म्हणून सत्यनारायणपूजा केली तर ते सयुक्तिक ठरेल. पण सत्यनारायणपूजा केल्यावर वास्तुशांती करण्याची आवश्यकता नाही असे कोणी प्रतिपादन करू लागला तर ती अज्ञानमूलक गैरसमजूत ठरेल. काही जण विधिपूर्वक वास्तुशांती करून त्या दिवशीच सत्यनारायणपूजा करण्याचा आग्रह धरतात. वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायणपूजा केल्यास त्यापासून निराळे असे कोणते लाभ मिळतील असे मुळीच नाही. कारण सत्यनारायणाच्या वेळी मांडले जाणारे अष्टलोकपाल व नवग्रह वास्तुशांतीच्या वेळी ग्रहमखाच्या निमित्ताने आपोआपच पूजले जातात. शिवाय सत्यनारायणपूजेत ‘विष्णू' ही मुख्यदेवता असून ती वास्तुदेवतेच्या मानाने उच्चस्तरीय असल्यामुळे वास्तुशांतीच्या दिवशी कळत-नकळत विष्णुदेवतेला मुख्यत्व व वास्तुदेवतेला गौणत्व प्राप्त होते. ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्याच्या हस्ते आयोजित केलेल्या उद्घाटनसोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहिल्यास जो प्रसंग ओढवेल तोच प्रसंग वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायणपूजा ठेवल्यास ओढवू शकतो. शिवाय सत्यनारायण हा व्रतपूजेचा प्रांत आहे, तर वास्तुशांती हा याज्ञिकाचा प्रांत आहे. त्या दृष्टीने विचार केल्यास यज्ञकार्य आणि पूजाकार्य ह्यांमध्ये यज्ञकार्य हे श्रेष्ठ मानले जाते. पण यज्ञकार्याच्या दिवशी पूजाकार्य आयोजित केल्यास मुख्यत्व आणि गौणत्व ह्यांचे निकष कार्यासाठी घ्यावयाचे की देवतेसाठी घ्यावयाचे ह्याबद्दलही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ह्यासाठी सुवर्णमध्य म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम केवळ घरच्या लोकांपुरता मर्यादित ठेवून त्यानंतर सोयिस्कर दिवशी परिचितांना व संबंधितांना निमंत्रित करून सत्यनारायणमहापूजा आयोजित करावी. त्यामुळे मुख्यपक्षाने वास्तुशांतीही उत्कृष्ट पद्धतीने संपन्न होते व नंतर पूजेच्या निमित्ताने परिचितांनाही मान दिल्यासारखे होते.
-
Does PANDITJIPUNE serve internationally?Yes, PANDITJIPUNE provides services internationally.You can book our services worldwide. Experience in what promises to be a truly unique & unforgettable spiritual journey with our religious and astrological services,all with full devotion across the worldWe have international clients as well. We have priests almost in every Indian language. The website is availble in almost all languages in the world. We have an international payment gateway PAY PAL connected to the site with currency convertor enabling our overseas clients to book services and shop products online. Our whatsapp number is intnl +91 7875032009 or Drop an email to support@panditjipune.com You may contact us anytime. Book and experience in what promises to be a truly unique and unforgettable divine journey with our devotional services,all with complete devotion and utmost faith,As well as you can DOWNLOAD OUR APP PANDITJIPUNE VIA LINK http://wix.to/8sANBzM?ref=mam GET PANDITJIPUNE ON Google Play Download on the App Store Join us on the App just click http://wix.to/8sANBzM?ref=mam Easily stay updated on the go. or Scan te code to download
-
वास्तुशांती' म्हणजे काय ? वास्तुशांतीची कोणकोणती अंगे आहेत?What is 'Vastushanti'? What are the Shubha Muhurts Auspicious days Dates and Timings for Vastushanti Gruhapravesh in 2024?What are the parts and components of Vaastu Shanti?What does Dharma Shastra say? How should Gruhapravesh be performed? 'VastuShanti Grihapravesh Dates December 2023 : 25,27. शास्त्र असे सांगते वास्तुशांती' म्हणजे काय ? वास्तुशांतीची कोणकोणती अंगे व उपांगे आहेत ? 'वास्तुशांती' हा विधी विविध अंगोपांगांनी संपन्न होतो. त्यांपैकी वास्तुशांतीच्या प्राथमिक गोष्टींमध्ये पुण्याहवाचनापर्यंतचे विधी येतात. त्यानुसार यज्ञमानाने प्रथम नूतनयज्ञोपवीतधारण, पंचगव्यमेलन व पंचगव्यप्राशन करावे. नंतर आचमन, प्राणायाम, देशकालनिर्देश, वास्तुशांतिसंकल्प, गणपतिपूजन इत्यादी करून पुण्याहवाचनास प्रारंभ करावा. पुण्याहवाचनामध्ये वरुणपूजन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध इत्यादी विधी येतात. पुण्याहवाचनानंतर आचार्यवरण (पुरोहिताची नियुक्ती) करावे. आचार्यवरण झाल्यानंतर पुरोहित; वास्तुपीठमांडणी, रेखाकरण, वास्तुप्रतिमेचे अग्न्युत्तारण व प्राणप्रतिष्ठा, देवता-ग्रह-अग्नी ह्यांची स्थापना, अन्वाधान व पूजा इत्यादी गोष्टी करून घेतात. त्यानंतर होमास प्रारंभ होतो. त्