Shree Lakshmi Kuber Pujan लक्ष्मीपूजन (दीपावली) 21 ऑक्टोबर 2025 , मंगळवार
लक्ष्मीपूजन (दीपावली) 21 ऑक्टोबर 2025 , मंगळवार
Mô tả dịch vụ
लक्ष्मीपूजन (दीपावली) 21 ऑक्टोबर 2025 , मंगळवार आश्विन अमावास्येचे दिवशीं प्रातःकाली अभ्यंगस्नान, प्रदोष काली दीपदान, लक्ष्मीपूजन इत्यादि सांगितली आहेत. सूर्योदयाला व्यापून पून्हा सूर्यास्तानंतर एक घटिकेपेक्षां अधिक रात्रीची व्याप्ति असेल तर संदेह नाहीं. या दिवशीं प्रातःकाली अभ्यंगस्नान, देवपूजा वगैरे करून अपरान्ह काली पार्वण श्राद्ध करावें. प्रदोषसमयीं दीपदान, उल्काप्रदर्शन व लक्ष्मीपूजन हीं करून नंतर भोजन करावें. या अमावास्येचे दिवशीं बाल, वृद्ध इत्यादिकावांचून इतरांनी दिवसास भोजन करूं नये. रात्री भोजन करावें असें विशेष वचन आहे. केवल दुसऱ्या दिवशीं अथवा दोन दिवस प्रदोषव्याप्ति असेल तर दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. पूर्वदिवशींच प्रदोषव्याप्ति असेल तर लक्ष्मीपूजनादिकाला पूर्व दिवसाचीच व अभ्यंगस्नान इत्यादिकाविषयीं दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. दोन्ही दिवस प्रदोषव्याप्त नसेल तरी असाच निर्णय जाणावा. पुरुषार्थचिंतामणीमध्यें, पूर्व दिवशींच प्रदोषव्याप्ति असेल व दुसर्या दिवशीं तीन प्रहराहून अधिक अमावास्येची व्याप्ति असेल तर अमावास्यपेक्षां प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मीपूजनादिक दुसऱ्या दिवशींच करावें, असें सागितलें आहे. या मतानें, दोन्ही दिवस प्रदोषकालीं व्याप्ति नसली तरी दुसऱ्या दिवशीं साडेतीन प्रहरांहून अधिक अमावास्येची व्याप्ति असते ह्मणून दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी हैं युक्त आहे असें वाटतें. चतुर्दशी पासून तीन दिवसांना दीपावली अशी संज्ञा आहे. यापैकीं ज्या दिवशीं स्वातीनक्षत्राचा योग असेल तो दिवस जास्त प्रशस्त होय. या अमावास्येचेच दिवशीं मध्यरात्री- नंतर नगरांतील स्त्रियांनी आपल्या गृहाच्या अंगणांतून अलक्ष्मीला बाहेर घालवावी. पूर्व दिवशींची घेतली असतां पर दिवशीं अपराह्नव्यापिनींत श्राद्ध असल्यामुळे या कमाचा वाघ आला, असें म्हणू नये. कारण, संपूर्ण तिथीचे ठायींच त्या क्रमानी प्राप्ति असल्यामुळे त्याचा अनुवाद केला आहे. त्या क्रमाचा अपूर्वविधि नाहीं. कारण, ह्या क्रमविधायक वाक्यापेक्षां त्या त्या कर्मकालव्याप्तिशास्त्राला बलिष्ठ्ठ आहे. धर्मसिंधू, निर्णयसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, कृत्त्यसंग्रह इत्यादि ग्रंथानुसार - १) अमावास्या सूर्योदयाला आरंभ होऊन सूर्यास्तानंतर १ घटीका (२४ मिनिटे) पेक्षा जास्त प्रदोषव्यापिनी अथवा त्याहून जास्त रात्रव्यापिनी असेल तर त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे. २) जर दोन्ही दिवशी प्रदोषकाळ व्याप्ती नसेल तर दुसऱ्या दिवशी घ्यावे. ३) पुरुषार्थ चिंतामणी मते पूर्व दिवशीच प्रदोषव्याप्ती असेल व दुसऱ्या दिवशी ३ प्रहराहून अधिक अमावास्या असेल तर श्रीलक्ष्मीपूजन दुसरे दिवशी करावे. याचे खंडन धर्मसिंधूकारांनी केले आहे की दोन दिवस प्रदोषव्याप्ती नसेल तर दुसरे दिवशी लक्ष्मीपूजन करावे. श्रीलक्ष्मीपूजन मुहूर्त 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार संध्याकाळी 06.11 ते संध्याकाळी 08.25 च्या दरम्यान आहे
Chính sách hủy
No refund on cancellation
Chi tiết liên hệ
+917875032009
vedmatagayatri4@gmail.com
Vrindavan Apartment No 506, Aanandghan Bulding, Garmal, Dhayari, Pune, Khadewadi, Maharashtra 411041, India