चैत्र शुद्ध प्रतिपदा संवत्सरारंभ.हिंदू नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
चैत्र मासी शुक्ल पक्षी प्रथम दिवशी सूर्योदयी ब्रह्मदेवाने सर्व जग निर्माण केले.याच प्रतिपदेला कल्पाचा देखील प्रारंभ होतो.चैत्र शुक्ल प्रतिपदा ही मत्स्य जयंती असे कोणी म्हणतात.चैत्र शुद्ध प्रतिपदेला संवत्सराचा आरंभ होतो.या दिवशी प्रतिपदा सूर्योदयव्यापिनी घ्यावी. चैत्रमासाचे शुक्ल पक्षाची जी पहिली प्रतिपदा, त्या दिवशी उपोषण करून ब्रह्म देवाचे पूजन करावे. तेणेकरून वर्ष पर्यंत अनेक सुखे प्राप्त होतात असे हेमाद्री विष्णू धर्म वचन आहे.नूतन संवत्सराच्या आरंभा निमित्त तैल अभ्यंग नित्य आहे. कारण, वर्षाचा प्रथम दिवस, वसंताचा प्रथम दिवस, बळीराज्य (बलिप्रतिपदा) यांचे ठाई तैल अभ्यंग न करणारा नरकास जातो. असे वसिष्ठ वचन आहे.याच प्रतिपदेच्या दिवशी देवीच्या नवरात्राला आरंभ करावा. संकल्पात नव्या वर्षाचा नामोच्चार करणे गरजेचे असते. प्रत्येकाने आपल्या घरी ध्वजारोपण करणे, निंब पत्राचे भक्षण, वर्ष फलाचे श्रवण,नवरात्राला आरंभ, आणि नवरात्रोत्सव संबंधाने संकल्प ही सर्व कर्मे शुद्ध मासाच्या प्रतिपदेला करावी.नवीन वर्षाच्या आरंभा संबंधाने तैल अभ्यंग शुद्ध मासाच्या प्रतिपदेलाच करावे असे मयूखात सांगितले आहे.तैल अभ्यंग करणे हे नित्य कर्म आहे. न केला असता दोष सांगितला आहे.
चैत्र महोत्सव प्राप्त झाला असता ब्राह्मणाने सांगितलेल्या शुभ दिवशी प्रपदनाचा प्रपादानाला (पानपोई) घालण्यास प्रारंभ करावा.
प्रपेयम् सर्वसामान्या भूतेभ्य: प्रतिपादिता।।
अस्या: प्रदानात पितर स्तृप्यंतू हि पितामह:।।
या मंत्राने उत्सर्ग करून चार महिने प्राणिमात्रास जल द्यावे.चार महिन्यांपर्यंत सर्वांस यथेच्छ जलदान करावे.
प्रपा (पानपोई) घालण्यास असमर्थ असेल पण विशेष धर्म व्हावा अशी इच्छा करणाराने दररोज लाल वस्त्राने मुखला वेष्टन केलेला,थंड स्वच्छ पाण्याने भरलेला लाल वस्त्राने मुखाला वेष्टन केलेला शुध्द धर्मघट कुंभ ब्राह्मणाच्या घरी द्यावा.
त्याचा मंत्र
एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णूशिवात्मक:।।
अस्य प्रदानातसकला मम संतु मनोरथा:।।
अद्य शुभतिथौ ......( गोत्राचे नाव. गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र घ्यावे.)
गोत्रोत्पन्नस्य.....(स्वतःचे व्यावहारिक नाव)
नाम्नः मम आत्मनः सकल शास्त्र पुरानोक्त - फलप्राप्तये अस्माकं स कुटुंबानाम् स परिवारानां क्षेम- स्थैर्य - दीर्घायुः आरोग्य- ऐश्वर्य कुलाभिवृद्धि अभिष्ट फल सिद्ध्यर्थे अस्मिन् प्राप्त नूतन वत्सरे अब्दान्तः नित्यमंगल आवाप्तये प्रतिसंवत्सर विहितं यथाज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः आरोपण पूर्वकम् ब्रह्मध्वज पूजनं करिष्ये।
तथा आरोग्य अवाप्तये निंबापत्र भक्षणं कल्पोक्त फल आवाप्तये
संवत्सर फल पठनं / श्रवणं च करिष्ये।।
आदौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं महागणपति स्मरणम् करिष्ये।
गणपतीस मनोमन नमस्कार करावा.
ओंजळीत अक्षता व फुले घ्यावीत.
ब्रह्मध्वज् नमस्तुभ्यं सर्वकल्याणकारक।
मद्गृहे कुरु कल्याणम् सर्वकामार्थ सिद्धिदम्।।
ब्रह्म ध्वजाय नमः। सकल पूजार्थे पुष्प अक्षतान् समर्पयामि।
गुढीवर अक्षता व फुले वाहावीत.
गंध पुष्प धूप दीप नैवेद्य या पंचोपचारांनी गुढीची पूजा करून गुढी ची प्रार्थना खाली दिल्या प्रमाणे करावी.
ब्रह्मध्वज नमस्ते स्तु सर्वाभीष्टफलप्रद।
प्राप्ते स्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु।।
ब्रह्मध्वजाय नमः। प्रार्थना पुष्पं समर्पयामि।
।।अथ निंबापत्रसेवनम्।।
निंबाची कोवळी पाने व फुले, मिरे, हिंग, मीठ, ओवा,साखर, चिंच ह्या सर्वांचे योग्य प्रमाण घेउन ते पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये ठेवून त्याचे चूर्ण करावे.
पारिभद्रस्य पात्राणि कोमलानि विशेषतः। स पुष्पाणि समानीय चूर्णं कृत्वा विधानतः।
मरीचलवनं तिन्तिन्या हिंगु शर्करयायुतं। अजमोदायुतं कृत्वा भक्षये रोग शान्तये।
असे म्हणून घरातील सर्वांनी या आरोग्यदायी मिश्रणाचे सेवन करावे.
।। अथ पञ्चाङ्गफलश्रवणम्।।
(नवीन पंचांगावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. पंचांगस्थ पंचांगा वरील गणपतीची पंचोपचार पूजा करावी.पंचांग सांगणाऱ्या पुरोहितास गंध पान सुपारी अक्षता दक्षिणा व फुल देऊन नमस्कार करावा. पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फल त्यांचेकडून श्रवण करावे. या दिवशी शक्य झाल्यास पंचांग दान करावे.)
।। अथ उत्तरपूजा ।।
उपरोक्त पद्धतीने ब्रह्म ध्वजाचे पूजन केल्यानंतर पुरोहित व आप्तेष्ट यांच्या समवेत मिष्ठान्न भोजन करावे. सूर्यास्तसमयी मस्तकावर टोपी परिधान करून गुढीला गंध फूल अक्षता वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी सावकाशपणे खाली उतरवावी साखर काठीचा प्रसाद घरातील सर्वांना द्यावा गुढी चे वस्त्र सुती असेल तर ते नंतर देवघरात वापरता येते रात्री यथाशक्ती गीत नृत्य भजन पूर्वक जागरण करावे. टीप (गुढी उभी करताना, उभी केल्यावर किंवा उतरवताना ती आढळल्यास दु,: शकुन परिहारार्थ अद्भुत दर्शन शांती करावी किंवा विष्णुसहस्त्रनाम पठण करावे.)
संवत्सर फल श्रवण करण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करावे.
श्री गणेशाय नमः।। श्री सरस्वत्यै नमः।। ।।अथ संवत्सर फलम्।।
स जयति सिन्धूर्वदनो देवो यत्पाद पङ्कज स्मरणम् ।
वासरमणिरिव तमसां राशीन् नाशयति विघ्नानाम्।।१।।
प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे ते मिरज समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदुरवदन देव उत्कर्ष पावत आहे.
नत्वा गणपतिं खेटान् ब्रह्मविष्णुशिवत्मकान्।
संवत्सरफलम् वक्ष्ये सर्व कामार्थसिद्धये।।२।।
सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो.नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगलस्नान अभ्यंग करून ब्राह्मणांसह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषण करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्ष फल श्रवण करावे. म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल.प्रथम मंगलस्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे. म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी संपत्ती ही प्राप्त होतात. मिरे,हिंग,मीठ, ओवा, व साखर यांच्यासह पुष्पा सहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून,रोग शांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दान अधिकाऱ्यांनी संतोष होऊन मिष्ठान्न भोजन घालावे. नाना प्रकारचे गीते वादे व पुण्य पुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा. म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. परधान यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते.
Comments