top of page
Search

Ganesh Jayanti 2026. Maghi Ganesha birth Winayak Chaturthi Tilkund chaturthi

Updated: Jan 22

Ganesh Jayanti 2026 :  

गणेश पुराण अंतर्गत श्री गजानन ध्यानम् संपूर्ण

एकदंतम् शूर्पकर्णम् गजवकत्रं चतुर्भुजम् 

पाशांकुशधरम्  देवम् मोदकान बिभ्रत करै:  ll२२ll

रक्तपुष्पमयीम मालाम् कंठे हस्ते पराम् शुभाम्

भक्तानाम् वरदम् सिद्धीबुद्धिभ्यां सेवितम् सदा ll२३ll

सिद्धीबुद्धिप्रदम् नृणाम्  धर्मार्थकाममोक्षदम्

ब्रह्मरुद्रहरीइंद्राद्ये: संस्तुतम्  परमर्शिभि: ll२४ll

हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्त्व आहे. काळे तीळ आणि पांढरे तिळ याला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळाला अधिक महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात सुरु मकर संक्रातीचा हा सण रथसप्तमीला समाप्त होतो. त्यानंतर माघ महिन्यातील येणारी पहिली विनायकी चतुर्थी (Vinayaka chaturthi 2026 ) अतिशय खास असते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात. या यादिवशी गणरायाला तिळाचं नैवेद्य दिलं जातं. तर याच दिवशी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जयंती आहे. (Ganesh Jayanti 2026 date time muhurat puja vidhi maghi ganesha birth vinayak chaturthi tilkund chaturthi)

गणेश जयंती कधी आहे? (Ganesh Jayanti 2026 )

माघ महिन्यातील चतुर्थीला गणेश जयंती साजरा करण्यात येते. यादिवशी महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी बाप्पाची पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ बाप्पाची स्थापना करुन मनोभावे पूजा केली जाते. 

Stone statue of Lord Ganesha, garlanded, against grey wall. Diwali Lakshmi Pujan दिवाळी लक्ष्मी पूजन PANDITJIPUNE

माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करा. सर्वप्रथम लाकडी पाट किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड पसरून त्यावर गणरायाचा फोटो किंवा मातीची किंवा घरातील तांबी, पितळ, चांदीची मूर्ती स्थापन करा. त्यानंतर पाण्याने स्नान करून वस्त्र, हार, फुले, दुर्वा, फुलांच्या माळा, सिंदूर, हळद, ओले अक्षत इत्यादी गणेशाला अर्पण करा. 16 षोडशोपचारने पूजा संपन्न झाल्यावर आरती करा. देवाला तिळ आणि गुळाचं नैवेद्य दाखवायला विसरु नका. आता अथर्वशीर्षाचं पठण करा. यादिवशी आठवणीने बाप्पाला 21 दुर्वा वाहा. त्याशिवाय गणेश मंत्र, गणेश चालीसा, गणेश स्तोत्र, गणेश चतुर्थी व्रत कथा पाठ तुम्ही करु शकता. 

गणपति ध्यानं

ॐ गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्र त्रिनेत्रं, बृहदुदरमशेषम् भूतिराजम् पुराणम्।

अमरवरसंपूज्यन् रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि।।

लम्बोदरं चतुर्बाहुं त्रिनेत्रं रक्तवर्णकम् l

नानारत्नैः सुवेषाढ्यन् प्रसन्नास्यं विचिन्तये।

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2026 

bottom of page
https://manage.wix.com/catalog-feed/v1/feed.tsv?marketplace=google&version=1&token=L6pyf%2F%2BCAsNOB5TcfltUWwm29a2SdYssSfYd%2BVC1LUyXMYQdHORi5DDXy48%2BwmbI&productsOnly=false