आश्विन अमावास्येचे दिवशीं प्रातःकाली अभ्यंगस्नान, प्रदोष काली दीपदान, लक्ष्मीपूजन इत्यादि सांगितली आहेत. सूर्योदयाला व्यापून पून्हा सूर्यास्तानंतर एक घटिकेपेक्षां अधिक रात्रीची व्याप्ति असेल तर संदेह नाहीं. या दिवशीं प्रातःकाली अभ्यंगस्नान, देवपूजा वगैरे करून अपरान्ह काली पार्वण श्राद्ध करावें. प्रदोषसमयीं दीपदान, उल्काप्रदर्शन व लक्ष्मीपूजन हीं करून नंतर भोजन करावें. या अमावास्येचे दिवशीं बाल, वृद्ध इत्यादिकावांचून इतरांनी दिवसास भोजन करूं नये. रात्री भोजन करावें असें विशेष वचन आहे. केवल दुसऱ्या दिवशीं अथवा दोन दिवस प्रदोषव्याप्ति असेल तर दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. पूर्वदिवशींच प्रदोषव्याप्ति असेल तर लक्ष्मीपूजनादिकाला पूर्व दिवसाचीच व अभ्यंगस्नान इत्यादिकाविषयीं दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी. दोन्ही दिवस प्रदोषव्याप्त नसेल तरी असाच निर्णय जाणावा. पुरुषार्थचिंतामणीमध्यें, पूर्व दिवशींच प्रदोषव्याप्ति असेल व दुसर्या दिवशीं तीन प्रहराहून अधिक अमावास्येची व्याप्ति असेल तर अमावास्यपेक्षां प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मीपूजनादिक दुसऱ्या दिवशींच करावें, असें सागितलें आहे. या मतानें, दोन्ही दिवस प्रदोषकालीं व्याप्ति नसली तरी दुसऱ्या दिवशीं साडेतीन प्रहरांहून अधिक अमावास्येची व्याप्ति असते ह्मणून दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी हैं युक्त आहे असें वाटतें. चतुर्दशी पासून तीन दिवसांना दीपावली अशी संज्ञा आहे. यापैकीं ज्या दिवशीं स्वातीनक्षत्राचा योग असेल तो दिवस जास्त प्रशस्त होय.
या अमावास्येचेच दिवशीं मध्यरात्री- नंतर नगरांतील स्त्रियांनी आपल्या गृहाच्या अंगणांतून अलक्ष्मीला बाहेर घालवावी. पूर्व दिवशींची घेतली असतां पर दिवशीं अपराह्नव्यापिनींत श्राद्ध असल्यामुळे या कमाचा वाघ आला, असें म्हणू नये. कारण, संपूर्ण तिथीचे ठायींच त्या क्रमानी प्राप्ति असल्यामुळे त्याचा अनुवाद केला आहे. त्या क्रमाचा अपूर्वविधि नाहीं. कारण, ह्या क्रमविधायक वाक्यापेक्षां त्या त्या कर्मकालव्याप्तिशास्त्राला बलिष्ठ्ठ आहे. आणि जर हे वाक्य क्रमाचें विधायक म्हटलें तर संपूर्ण तिथि असतां क्रमप्राप्त असल्यामुळे त्याविषयीं अनुवादक महटले पाहिजे, व खंड तिथीचे ठायीं अप्राप्त असल्यामुळे त्याविषयीं विधायक म्हटले असतां जे विधिवाक्य तेच अनुवादक झाल्यानं विधीचा व अनुवादाचा एकत्र विरोधही येतो, असें सांगितलं आहे. त्याच अमावास्येस अपररात्री अलक्ष्मीचं निःसारण सांगतो मदनर भविष्यांत " याप्रमाणे मध्यरात्र गेली असतां निद्रेनें लोकांचे अर्धे डोळे मिटले असतां त्या वेळी नगरांतील स्त्रियांनी सूप व डिंडिम ( दंवडी ) वाजवून मोठ्या आनंदानं आपआपल्या गृहांगणांतून अलक्ष्मी बाहेर घालवावी.
ความคิดเห็น