द्वादशीला आरंभ करून पांच दिवसपर्यंत पूर्वरात्री नीरांजन विधि करावा असे नारदांनी सांगितलं आहे. "देव, ब्राह्मण, गाई, अश्व, ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ यांना माता व इतर सर्व स्त्रियांनी ओवाळावे." अपमृत्यूचा नाश होण्याकरितां त्रयोदशीच दिवशी रात्रीचे आरंभी घराबाहेर यमाकरितां दिवा लावावा. याच त्रयोदशीला आरंभ करून गोत्रिरात्र व्रत करावें.
नारद—“अश्विनकृष्णद्वादशीपासून कार्तिकशुद्धप्रतिपदेपर्यंत पांचदिवस पूर्वरात्री नीरांजन विधि सांगितला आहे तो असा देव, ब्राह्मण, गाई, घोडे,ज्येष्ठ, श्रेष्ठ,लहान या सर्वांस मातृप्रमुख स्त्रियांनी ओवाळावे ."
निर्णयामृतांत स्कांदांत - या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला वात पेटवून यमाला दीप द्यावा, तेर्णेकरून अपमृत्यूचा नाश होतो." याचा मंत्रः "मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामया सह ॥ त्रयोदश्यां दीपदानात्सूर्यजः प्रीयता मम."
Comments