श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत विधि निर्णय सिंधु
श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत विधि निर्णय सिंधु
अष्टमीचे दिवशीं विशेष विधि सांगतो - हेमाद्रीत भविष्यांत - "या जन्माष्टमीचे दिवशीं विळ वाहून अंगास लावून नयादिकांच्या खच्छ जलामध्ये स्नान करून उत्तम प्रदेशी देवकीचे सुंदर सूतिकागृह करावें, व त्यामध्ये कृष्णाची प्रतिमा (मूर्ति) स्थापावी. ती आठ प्रकारची सांगितली आहे ती अशी- सुवर्ण, रजत, ताम्र, पित्तल, मृत्तिका, वृक्ष, मणि यांची अथवा रंगांनी लिहिलेली अशी सर्व लक्षणयुक्त (कृष्णाची) प्रतिमा पत्रात पलंगावर ठेवून, स्था सूतिका- गृहामध्ये एका प्रदेशी मंचकावर प्रसूत झालेल्या व दुग्ध स्रवणान्या अक्षा देवकीचे स्थापन करावें. त्या पर्यकावर निजलेला व स्तनपान करणारा असा जो मी बालक याचे (कृष्णाचे) स्थापन करावें, व त्या सुतिकागृहामध्ये एका प्रदेशी यशोदा व तिला झालेली कन्या अशीं पूर्वीप्रमाणेच स्थापाव, मसुदेव हा कश्यप, देवकी ही अदिति, बलराम हा शेष, यशोदा ही तसाच यमुनेचा हद लिहून त्यामध्ये कालिया सर्व लिहावा. इत्यादिक जें कांहीं माझें चरित्र लिहिण्यास शक्य आहे ते पृथ्वी आहे, नंद हा प्रजापति दक्ष गर्ग हा देव आहे. गाय ही पेन, हत्ती, शस्त्र धरणारे दानव हे सर्व तेथे लिहावे. सततपरिवृता वेणुवीणानिनादैः श्रृंगारादर्शकुंभश्वरकृत करैः किंकरैः सेव्यमाना ॥ पयेके स्वास्तृते लिहून प्रयत्नानें भक्तियुक्त होऊन पूजन करावें व देवकीचंही पूजन करावें. पूजाप्यानमंत्रः " गायद्भिः किंनराधेः या मुदिततरमुखी पुत्रिणी सम्यगास्ते सा देवी देवमाता जयति सुतनया देवकी कांतरूपा ॥ १ ॥ " "देवकीचे चरणाजवळ (कृष्णाचे) पादसंवाहन करणाऱ्या व कमलांत वसलेल्या अशा लक्ष्मीचें "नमो देव्यै थिये" या मंत्रानें पूजन करावे.
हितः शंखेतोयं समादाय पुष्पकुशचंदनं जानुभ्यांघरणींगत्वाचंद्रायायनिवेदयेत् क्षीरोदाणेव संभूतअत्रि- अर्धरात्रेवसोर्धारांपातयेद्गुडसर्पिषा नाडीवर्धापनंषष्ठीनामादेः करणंमम ततोमंत्रेणवैद्याचंद्रायासमा. • गोत्रसमुद्भव गृहाणार्द्धशशांकेदरोहिण्यासहितोमम ज्योत्स्ना पतेनमस्तुभ्यंनमस्ते ज्योतिषांपते नमस्ते रोहि- कांतअर्घ्यः प्रतिगृह्यतां यथापुत्रहरिलब्ध्वाप्राप्तातेनिर्वृतिः परा तामेवनिर्वृतिदेहिसुपुत्रं दर्शयस्वमे इति- देवक्यर्थः ततः पुष्पांजलिंदत्वायामे या मेप्रपूजयेत् प्रभाते ब्राह्मणानशक्याभोजयेद्भक्तिमान्नरः अनमो वासुदेवायगोब्राह्मणहितायच शांतिरस्तुशिवंचास्तुइत्युक्त्वामांविसर्जयेत् इदं प्रतिमासकृष्णाष्टम्याप्युक्तं- मदनरत्नेवह्निपुराणे प्रतिमासंचतेपूजामष्टम्यांयः करिष्यति ममचैवा खिलान् कामान्स संप्राप्स्यत्यसंशयं तथा अनेनविधिनायस्तुप्रतिमासंनरेश्वर करोतिवत्सरंपूर्ण गावदागमनंहरेः दद्याच्छग्यांसुसं पूर्णाभोगीरने- रलंकृतां इतिजन्माष्टमीत्रतं ।
मध्यरात्रीं गुड व घृत यांची वसोर्धारा घालावी. नालच्छेदन, षष्ठीपूजन, नामकरण इत्यादिक माझें (कृष्णाचें ) करावें. नंतर समाहितचित्त होऊन चंद्राला अर्प्य यावे. त्याचा प्रकार-शंखामध्ये उदक घेऊन त्यांत पुष्प, दर्म, चंदन घालून गुडभ्यांनीं भूमिस्पर्श करून (गुडघे भूमीवर टेकून ) चंद्राला अर्घ्य यावे." त्याचा मंत्रः- “क्षीरोदार्णयसंभूत यत्रिगोत्रसमुद्भव | गृहाणार्थं शशांकेदं रोहिण्या सहितो मम || ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते ज्योतिषांपते ॥ नमस्ते रोहिणीकांत अर्ध्यं नः प्रतिगृह्यतां”॥ "यथा पुत्रं हरिं लब्ध्वा प्राप्ता ते निर्वृतिः परा ॥ तामेव निवृति देहि सुपुत्रं दर्शयस्व मे" || हा देवकीच्या अर्ध्याचा मंत्र. “नंतर पुष्पांजलि देऊन महरा - प्रह्राचे ठायीं पूजन करावें. भक्तियुक्त होऊन प्रातःकाल यथाशक्ति ब्राह्मणभोजन घालावें. "ॐ नमो वासुदेवाय गोब्राह्मणहिताय च ॥ शांतिरस्तु शिवं वास्तु" असें म्हणून माझें विसर्जन करावे
" हे कृत्य प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अष्टमीस करण्याविषर्यी सांगितलें आहे. मदनरत्नांत वह्निपुराणांत "प्रत्येक मासाचे कृष्णाष्टमीचे ठायीं तुझी ( देवकीची ) पूजा जो करील व माझी (कृष्णाची ) ही पूजा जो करील त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील यांत संशय नाहीं.” तसेच “या विधीनं जो प्रत्येक महिन्यामध्ये जोपर्यंत हरीचे आगमन होईल ( जन्माष्टमी येईल ) तोंपर्यंत सार्या वर्षभर पूजन करील व पूर्वी सांगितलेली शय्या रत्नांनीं अलंकृत करून देईल त्याला सर्व भोग प्राप्त होतील.” ॥ इति जन्माष्टमीव्रताचा निर्णय समाप्त झाला ॥
Comentários