दक्षिणा विचार
निर्णयसिंधु:
व्रत उद्यापन :ज्या व्रताला जे उद्यापन उक्त असेल ते व्रताच्या
समाप्तीस करावे. जे व्रत उद्यापनविरहित ते निष्फल होते.
जर उद्यापन उक्त नसेल तर त्या व्रताला योग्य असे उद्यापन करावे. वद्रव्यानुसार गोप्रदान सुवर्ण दान करावे.त्यायोगे व्रताची सांगता होते. अशक्ति असता सर्वांचाही अलाभ असेल तर यथाविधी केल्या वाचूनही ही केवळ ब्राह्मणाच्या वचनाने व्रताची सांगता होते.
जो मनुष्य ब्राह्मणास दक्षिणा दिल्यावाचून ब्राह्मण वचन घेतो तो पापी होऊन नरकास जातो.
वेदात व उपनिषदात उक्तभूमि, गाय, सुवर्ण ही दक्षिणा सांगितली आहे शिव नेत्रापासून रौप्य उत्पन्न झाले म्हणून ते पितरांना प्रिय व मंगल आहे यास्तव ते देवकार्यात वर्ज करावे. कलियुगामध्ये मुक्त भुमी गाय सुवर्ण ही दक्षिणा सांगितली आहे. ते शक्य नसेल तर त्याच्या व्यावहारिक किमतीनुसार आपल्या उत्पन्न चलन स्त्रोतास अनुसरून दक्षिणा प्रदान गरजेचे आहे.
उदाहरणार्थ-जर एखादा मनुष्य अमेरिकन डॉलर्स मध्ये अर्थप्राप्ती करत असेल आणि त्याने जर भारतात धर्मकार्य करायचे ठरविले तर त्याने गुरुजींची दक्षिणा ही भारतीय रुपयांमध्ये न देता अमेरिकन डॉलर्स प्रमाणे देणे धर्म शास्त्राला अभिप्रेत आहे.कारण त्याच्या उत्पन्नाचा स्त्रोत हा भारतीय रुपया नसून अमेरिकन डॉलर आहे. म्हणजे गुरुजी जी दक्षिणा भारतीय रुपयांमध्ये सांगतील ती दक्षिणा त्याने अमेरिकन डॉलर्स मध्ये देणे गरजेचे असते. थोडक्यात जेवढे रुपये तेवढे डॉलर्स. अन्यथा तो दक्षिणा दिल्यावाचून ब्राम्हण वचन घेतो असे होईल.
Komentar