top of page
Search

जन्माष्टमी व्रत धर्म सिंधु

जन्माष्टमी व्रत धर्म सिंधु

अष्टमी दोन प्रकारची आहे. शुद्धा आणि विद्वा. दिवसास अथवा रात्रीस सप्तमीयोगरहित अशी ज्या दिवशी जितकी असेल त्या दिवशी तितकी शुद्धा. दिवसास अथवा रात्रीस सप्तमीयोगा- ने युक्त अशी ज्या अहोरात्रामध्ये जितकी असेल त्या दिवशी तितकी विद्धा. ती पुनः दोन प्र कारची आहे, एक रोहिणी नक्षत्रानें युक्त आणि दुसरी रोहिणी नक्षत्रविरहित. यानंतर रोहिणीयोग असतां, शुद्धसम अथवा शुद्धन्यून अष्टमी असून अल्प रोहिणीयोग असला तरी संशय नाहीं. शुद्धाधिक अष्टमी असून पूर्व दिवशी किंवा दोन्ही दिवशी रोहिणीयोग असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. शुद्धाधिक अष्टमी असून दुसन्या दिवशीच रोहिणीयोग असेल तर दोन घटिका असेल तथापि दुसम्या दिवसाची घ्यावी. विद्धाधिक अष्टमी असून पूर्वदिवशीं निशीथकालाच्या पूर्वी अथवा निशीथकाली रोहिणीयोग असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. दोन्ही दिवशी अथवा दुसन्या दिवशीच निशीथकाली अथवा निशीथकाल सोडून रोहिणीयोग असेल तर दुसऱ्या दिवसाची घ्यावी असा संक्षेपार्ने निर्णय सांगितला. याप्रमाणे कौस्तुमादिक नवीन अंथांनी ग्रहण केलेल्या माघवमताच्या अनुरोधाने जन्माष्टमीचा निर्णय सांगितला. या ठिकाणी कोणी सं- थकार केवल अष्टमी तीच जन्माष्टमी व जन्माष्टमी रोहिणीयुक्त असेल तीच जयंती असे मानून जयंती व अष्टमी या दोहोंचं एकच व्रत सांगतात. दुसरे ग्रंथकार, जन्माष्टमीव्रत व जयंतीव्रत निरनिराळी आहेत याकरितां रोहिणीयोग नसेल तर जयंतीव्रताचा लोप करून जन्माष्टमीयत करावें; ' ज्या वर्षी जयंती योग असेल तेव्हां जन्माष्टमी जयंतीचे ठिकाणी अंतर्भूत होते; याक रितां जयंतीचे दिवशीं कर्मकाली झणजे निशीथकाली अष्टमी नसेल तथापि साकस्य वचनांनी प्राप्त अशी कर्मकाळाची व्याप्ति घेऊन दोन्ही व्रतें जयंतीच्या दिवशी तंत्राने करावी; दोन्ही प्र नित्य असून काम्य आहेत; न केल्यास महादोष असून केली असतां महाफल आहे सणून दोन्ही करावी; नित्यव्रताचा लोप होईल तर दोष आहे याकरितां निशीथकालल्यापिनी अशा पूर्व दिवसाच्या अष्टमीचे ठिकाणी जन्माष्टमीव्रत करून जयंतीचे दिवशीं पारणा करू नये; असे क्षणतात. निर्णयसिंधूमध्ये तर पूर्वी सांगितल्या प्रकारे माधवमताचे उपपादन करून हेमाद्रीच्या गर्ते न्माष्टमति मात्र नित्य आहे, व जयंतत्रित नित्य आहे, तथापि तं कलियुगांत लुप्त झाले सणून कोणी करीत नाहीत असें सांगून आपल्या मते, ज्या वर्षी पूर्व दिवशी निशीथकाली अष्टमी असून दुसन्या दिवशी निशीथकालाहून इतर काली जयंती नांवाचा योग असतो याकरितां दोन्ही मते नित्य असल्यामुळे न केल्यास दोष आहे हाणून त्या वर्षी दोन उपोषण करावी; ' जयंतीचे ठिकाणी जन्माष्टमीचा अंतर्भाव होतो' असे जे वचन आहे ते मूखना फसविण्याकरिता आहे; असे प्रति पादन केले आहे. कौस्तुभ इत्यादि नवीन मेथांमध्ये माया मानलेले माधवमत त्याला अनुसरून जयंतीचा अंतर्भाव करून जन्माष्टमीचेच न करावें हेंच योग्य आहे असे मला वाटते. थाबताचे ठिकाणी बुधवार अथवा सोमवार यांचा योग येईल तर तो प्राशस्त्यबोधक आहे, रोहिणीयोगा प्रमाणे निर्णयापक्षी नाही.

पारणा सांगितली आहे तिचा काल

नंतर दुसन्या दिवशीं श्रताचं अंग झणून भोजनरूप सांगतो. - केवल तिथीचा उपवास असेल तर तिथीच्या अंती पारणा करावी नक्षत्रयुक्त ति थीचा उपवास असेल तर नक्षत्र व तिथि या दोहोंच्या अंतीं पारणा करावी. जर तिथि व न क्षेत्र यांपैकी एकाचा अंत दिवसास असेल व दोहोंचा अंत रात्री असेल तर दिवसासच एकाचा अंत झाल्यावर पारणा करावी. जर दिवसास एकाचाही अंत नसेल तर निशीथकालाच्या (मध्य-ली एकाचा जगर दोहोत असेल तर निशीथकालीही पारणा करावी. भोजनाचा असंभव अ रात्रीच्या पूर्वी एकाच्या अंती अथवा दोहोंच्या अंती पारणा करावी. जर निशीथकालाच्या पूर्वका सेल तर पारणेची सिद्धि होण्याकरितां फलादिकांचा आहार करावा. वर सांगितल्याप्रमाणे निशी थकाली पारणा करू नये, उपवासापासून तिसरे दिवशी दिवसास पारणा करावी असे कोणी ग्रंथ कारणतात ते योग्य नाही. अशक्त असेल त्याने एकाचाही अंत होण्यापूर्वी उत्सव समाप्त झा ल्यानंतर प्रातः काली देवपूजा विसर्जन इत्यादि करून पारणा करावी. 

विधि-

• श्रीकृष्ण प्रीत्यर्थ फलानि प्रातःकाली नानसंध्या वगैरे नित्यकृत्य केल्यावर देशकालादिकांचा उच्चार करून, त्या का सप्तमी इत्यादि तिथि असली तरी प्रधानभूत अष्टमीचाच उच्चार करून, जन्माष्टमीव्रतं करिष्ये' असा संकल्प करावा. जयन्तीयोग असेल तर जन्माष्टमीव्रत जयन्ती व्रतं च तन्त्रेण करिष्ये असा संकल्प करावा. तांब्याच्या पात्रामध्ये उदक घेऊन 'वासुदेव स मुद्देिश्य सर्वपापशान्तये । उपवासं करिष्यामि कृष्णाष्टम्यां नभस्यहम् || आजन्ममरणं यावद्यन्मया " दुष्कृतं कृतम् । तत्प्रणाशय गोबिन्द प्रसीद पुरुषोत्तम ॥ " असे म्हणत पात्रांतील उदक भूमीवर सोडावे, उपवास करण्याविषयी अशक्त असेल तर ' उपवासं करिष्यामि याऐवजी भक्षयिष्यामि ' अर्से ह्मणावें. नंतर सुवर्ण अथवा रजत यांच्या, अथवा मृत्तिकेच्या अगर भिंती- वर काढलेल्या, जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे प्रतिमा कराव्या. त्या अशा मंचकावर शयन केलेली देवकीची प्रतिमा करून तिचे स्तनपान करीत असलेली श्रीकृष्णाची प्रतिमा करावी. जयन्तीयोग असेल तर देवकीची आणखी एक मूर्ति करून तिच्या मांडीवर बसलेली श्रीकृष्णाची. ही दूसरी मूर्ति करावी. मंचकावर शयन केलेल्या देवकीचे चरण चुरीत असलेली लक्ष्मीची मूर्ति करावी. भिंतीवर खडधारी वसुदेव, नन्द, गोपी, गोप यांची चित्रे काढावी. दुसऱ्या ठिकाणी मं-


चकावर प्रसूत कन्येसह यशोदेची मूर्ति करावी. दुसऱ्या आसनावर वसुदेव, देवकी, नन्द, यशो दा, श्रीकृष्ण, राम ( बळीराम ), चण्डिका अशा सात प्रतिमा स्थापन कराव्या. इतक्या प्रतिमा करण्याविषयीं असमर्थ असेल त्यानें वसुदेवापासून चण्डिकेपर्यंत सात अथवा जसा आचार अथवा सामर्थ्य असेल त्याप्रमाणे कराव्या. आणि इतर मूर्तींचा जसा प्रचार सांगितला त्याप्रमाणे ध्यान करावे असे मला वाटते. मध्यरात्रीच्या जवळच्या पूर्वकाली स्नान करून ' श्रीकृष्णप्रीत्यर्थं सप- रियारश्रीकृष्णपूजां करिष्ये' असा संकल्प करावा. नंतर न्यास, शंखादिकांची पूजा वगैरे नित्या- प्रमाण करून “ पर्यकस्थां किन्नर धैर्युतां ध्यायेत्तु देवकीन् । श्रीकृष्णं बालकं ध्यायेत्पर्य के स्तन- पायिनम् ॥ श्रीवत्सवक्षसंशान्तं नीलोत्पलदलच्छविम् । संवाहयन्तीं देवक्याः पादौ ध्यायेच तां श्रियम् ।। " याप्रमार्णे ध्यान करावें. 'देवक्यै नमः या मंत्राने देवकीचे आवाहन करून मूलमंत्रानें अथवा पुरुषसूक्ताच्या ऋचें' श्रीकृष्णायनमः श्रीकृष्णमावाहयामि' याप्रमाणे आवाहन करून लक्ष्मीच आवाहन करून देवक्यै वसुदेवाय यशोदायै नन्दाय कृष्णाय रामाय चण्डिकायै ' याप्रमाणे ना- ममंत्रांनी आवाहन करावें. नंतर 'सकलपरिवारदेवताभ्यो नमः' याप्रमाणे लिखित देवतांचे आवाहन करावें. मूलमंत्राने अथवा पुरुषसूक्ताच्या ऋचेनें 'आवाहितदेवक्यादिपरिवारदेवतासहित- श्रीकृष्णाय नमः' असा उच्चार करून आसन, पाद्य, अर्घ्य, आचमनीय, अभ्यंगस्नान हीं अर्पण करून पंचामृतस्नान झाल्यावर चंदनाचा अनुलेप करावा. नंतर शुद्धोदकाचा अभिषेक झाल्यावर वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप इत्यादि उपचार 'विश्वेश्वराय विश्वाय तथा विश्वोद्भवाय च । विश्वस्य पतये तुभ्यं गोविन्दाय नमो नमः ॥ यज्ञेश्वराय देवाय तथा यज्ञेोद्भवाय च । यज्ञानां पतये नाथ गोविन्दाय नमो नमः ॥ " हे दोन मंत्र मूलमंत्रांसहित उच्चारून अर्पण करावे. "जगन्नाथ नमस्तुभ्यं संसारभयनाशन । जगदीश्वराय देवाय भूतानां पयते नमः ।। या मंत्राने नैवेद्य अर्पण करावा. मूलमंत्रादिकाची योजना सर्वत्र करावी. तांबूल इत्यादिकांपासून नमस्कार, प्रदक्षिणा, पुर्ष्या- जलीपर्यंत कर्म करावे. अथवा उद्यापनपकरणांत सांगितलेल्या विधीने पूजा करावी. ती याप्रमाणे- वर सांगितलेल्या प्रकाराने ध्यान व आवाहन करायें. "देवा ब्रह्मादयो येन स्वरूपं न विदुस्तव ।। अतस्त्वां पूजयिष्यामि मातुरुत्सङ्गवासिनम् || पुरुष एवेदमासनम् || अवतारसहस्राणि करोषि मधु- सूदन् । न ते संख्यावताराणां कश्चिज्जानाति तत्वतः । एतावानस्येतिपाद्यम् ।। जातः कंसवधार्थाय मूभारोत्तारणायच । देवानां च हितार्थाय धर्मसंस्थापनाय च। कौरवाणां विनाशाय पाण्डवानां हिताय च । गृहाणायै मया दत्तं देवक्या साहितो हरे । त्रिपादू अध्यम् ॥ सुरसुरनरेशाय क्षीराब्धिशयनाय च । कृष्णाय वासुदेवाय ददाम्याचमनं शुभम् ॥ तस्मा० आचमनीयम् ॥ नारायण नमस्तेस्तु नरकार्णवतारक। गङ्गोदकं समानीतं स्नानार्थं प्रतिगृद्यताम् ॥ यत्पुरुषे० स्नानम् ॥ पयोदधि घृतक्षौद्र शर्करास्नान- मुत्तमम् । तृप्त्यर्थं देवदेवेश गृह्यतां देवकीसुत || इति पचामृतम् शुद्धोदकस्नानमाचमनम् ॥ क्षौमं च पट्टसूत्राढ्यं मयानीतांशुकं शुभम् । गृद्यतां देवदेवेश मया दत्तं सुरोचम ॥ तं बजे० वस्त्रम् ॥ नमःकृष्णाय देवाय शंखचक्रधराय च ॥ ब्रह्मसूत्रं जगन्नाथ गृहाण परमेश्वर " तस्माद्यज्ञा० यज्ञोप- वीतम् ॥ नानागन्धसमायुक्तं चन्दनं चारुचर्चितम् । कुंकुमाक्ताक्षतैर्युक्तं गृद्यतां परमेश्वर ॥ तस्मा यज्ञा० गन्धम् ॥ पुष्पाणि यानि दिव्यानि पारिजातोद्भवानि च। मालतीकेसरादीनि पूजार्थ प्रति- गृद्यताम् ॥ तस्माद० पुष्पाणि ॥ अथाङ्गपूजा | श्रीकृष्णाय नमः पादौ पूजयामि । संकर्षणाय नमः गुल्फौ० । कालात्मने० जानुनी० । विश्वकर्मणे० नार्मि० । विश्वनेत्राय ० कटी० । विश्वकर्त्रे ० मेदूं । पद्मनाभाय नाभिं । परमात्मने ० हृदयं श्रीकृष्णाय कण्ठं० । सर्वास्त्रधारिणे० बाहू० । वाचस्पतये मुखं । केशवाय ललाटं० | सर्वात्मने० शिरः० विश्वरूपिणे नारायणाय सर्वांगं० वनस्पतिरसो० ॥ यत्पुरुषं० धूपं० । त्वं ज्योतिः सर्वदेवानां तेजस्त्वं तेजसां परम् । आ- हमज्योतिर्नमस्तुभ्यं दीपोयं प्रतिगृह्यताम् || ब्राह्मणो दीपं० ॥ नानागन्धसमायुक्तं भक्ष्यभोज्यं च- तुर्विधम्। नैवेद्यार्थे मया दत्तं गृहाण परमेश्वर || चंद्रमा मनसो नैवेद्यं || आचमनं करोद्वर्तनं० ॥ तांबूलंच सकर्पूरं पूगीफलसमन्वितम् ॥ मुखवासकरं रम्यं प्रीतिदं प्रतिगृह्यताम् || सौवर्ण राजतं ता नानारत्नसमन्वितम् । कर्मसाद्गुण्यसिद्ध्यर्थं दक्षिणा प्रतिगृह्यताम् || रम्भाफलं नारिकेलं तथैवाम्र- फलानि च । पूजितोसि सुरश्रेष्ठ गृह्यतां कंससूदन । नाभ्याआ० नीराजनं ० ॥ यानि कानि०॥ स याप्रमाणें प्तास्या० प्रदक्षिणाम् || यज्ञेनेत्यादिवेदमन्त्रैः पुष्पांजलिं नमस्कारान् ॥ प्रार्थना करून पूजा समाप्त करावी. अशी सर्वोपचारांनी युक्त पूजा समाप्त झाल्यावर बारा अंगुळे विस्तृत असा रुप्याचा अथवा भूमि इत्यादिकांवर लिखित असा रोहिणीसहित सोमस्य पतये चंद्र करून त्यांचे " सोमेश्वराय सोमाय तथा सोमोद्भवाय च नित्यं तुम्यं सोमाय वै नमः ॥" या मंत्रानें पूजन करावें. नंतर पुष्प, दर्भ, चंदन यांसह शंखानें उदक घेऊन “ क्षीरोदार्णवसंभूत अन्निगोत्रसमुद्भव । गृहाणायै शशाङ्केश रोहिणीसद्दितो मम || ज्यात्वापते नमस्तुभ्यं ज्योतिषां पतये नमः । नमस्ते रोहिणीकान्त अर्ध्य नः प्रतिगृचताम् ॥ या दोन मंत्रांनी चंद्राला अर्ध्य यावें. नंतर श्रीकृष्णाला अर्ध्य द्यावे. त्याचा मंत्र "जातः कंसवधा- ० अपराधस | थाय भूभारोत्तारणाय च । पाण्डवानां हितार्थाय धर्मसंस्थापनाय च ॥ कौरवाणां विनाशाय दैत्यानां निधनायच । गृहाणायै मया दत्तं देवक्या सहितो हरे ।।" याप्रमाणे अर्घ्य दिल्यानंतर "त्राहि मां भवान् - लोकेश हरे संसारसागरात् । त्राहि मां सर्वपापन दुःखशोकार्णवात्मभो ॥ सर्वलोकेश्वर त्राहि पतितंमग सर्वदन्न रोगशोकार्णवाद्धरे ।। दुर्गतांस्त्रायसे विष्णो ये स्मरन्ति सकृत्सकृत् । त्राहि मां देवदेवेश स्वछो नान्योस्ति रक्षिता । यहा कचन कौमारे यौवने यच वाघेक । तत्पुण्यं वृद्धिमानातु पार्थ दह हलायुध ।। " या मंत्रांनी प्रार्थना करावी.


पूजा झाल्यानंतरचे कृत्य अभिपुराणामध्यें सांगितलें आहे तें असें" याप्रमाणे पूजा करून पुरुषसूक्तांनी, विष्णुसूक्तांनी व इतर स्तोत्रांनी स्तवन करावें; वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, या निरनिराळ्या सत्कथा, प्राचीन पुराणेतिहास यांनी प्रेक्षकगणांसहवर्तमान ती रात्र घालवावी. " ठिकाणी कथांसंबंधी वैचित्र्य सांगितले तें देश, भाषा, काव्य इत्यादिकांसंबंधाच जाणावें. कारण सूक्तें अगोदर सांगून नंतर पुराणे, कथा वगैरे सांगितली. 'प्रेक्षकगणांसहवर्तमान' यावरून नृत्य, गायन, इत्यादिकांचा अंतर्भाव होतो. वैदिक सूक्तांनी स्तुतियुक्त, पुराण इतिहास वगैरेंनी मिश्रि- त, गायन नृत्य इत्यादिकांसह, देशभाषा काव्य वगैरे वैचित्र्य ज्यामध्ये आहे अशा प्रकारचा क. धायुक्त जागर ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य अशा तीन वणीना आहे; शूद्रादिकांनी अशा प्रकारचा जागर करूं नये. वैदिक सूक्तांनी रहित व गीत इत्यादिकांनी युक्त असा जागर चारी वर्णाना साधारण आहे असे दुसरे वचन आहे. गोकुळांतील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इत्यादिकांचे सिंचन करावें. कारण दहीं, दूध, घृत, उदक यांनी गोपालांनी परस्परांवर सिंचन व लेपन केलें " असे भागवतामध्ये वचन आहे. त्यावरून असा विधि प्राप्त होतो. हा उत्सव सांप्रत महाराष्ट्रामध्ये “ गोपालकाला रिवात असे मला वाटतें. हे सर्व श्रीमान् अनंतदेव यांनी कौस्तुभामध्ये स्पष्ट सांगितलें आहे. करितां या नांवानें लोक क मीच सांगतो अणून मजवर कोणी सगाऊं नये. अशा प्रकारच्या कथांनी युक्त जागर रामनवमी एकादशी इत्यादि इतर उत्सवांमध्येही करावा असे सांगितलं आहे; कारण पूजा, जागर इत्यादिनी युक्त असा व्रतोत्सव साधारण आहे आणि महाराष्ट्रीय लोकांमध्ये असा आचारही आहे. "

उत्सव प्रवेणीच दिवशी करावं अथवा रोज करावे' असे वचन आहे, याकरितां प्रेमळ भगवद्भक्त वर सांगितलेल्या कथा, उत्सव इत्यादि रोज करतात असे मला वाटते.

ततोनवम्यांत्राह्मणान् भोजनदक्षिणादिभिः सन्तोप्योक्तपारणानिर्णतिका- लेभोजनं कुर्यात अस्यैवजयन्ती व्रतस्यसंवत्सरसाध्यःपयोगः श्रावण कृष्णाष्टमी मारभ्यप्रतिमासं कृष्णाष्टम्यामुक्तविधिना पूजादिरूपः पुराणान्तरेकः अत्री- द्यापनविधिग्रन्थान्तरेज्ञेयः इतिजन्माष्टमी निर्णयः ।


याप्रमाणे उत्सव झाल्यानंतर नवमीचे दिवशी ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा इत्यादिकांनी संतुष्ट करून पारणेच्या निर्णीतकाली आपण भोजन करावे. हा जयंतीव्रताचा प्रयोग वर्षभर करावयाचा आहे. श्रावण कृष्ण अष्टमीला आरंभ करून प्रत्येक महिन्यास कृष्णाष्टमीचे दिवशी वर सांगि- तलेल्या विधीनें पूजा वगैरे करावी असे पुराणांमध्ये सांगितले आहे. या व्रताचा उद्यापनाचा विधि इतर ग्रंथांमध्यें पहावा. याप्रमाण जन्माष्टमीव्रताचा निर्णय सांगितला.

10 views0 comments

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
  • Instagram
  • Tumblr
  • Snapchat
  • Pinterest
  • Telegram
  • Gmail-logo
  • facebook
  • twitter
  • linkedin
  • youtube
  • generic-social-link
  • generic-social-link

Download PANDITJIPUNE

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.