गोवत्सद्वादशी:
कार्तिक कृष्ण द्वादशी ही गोवत्सद्वादशी होय. ती गोवत्सद्वादशी प्रदोषकाल व्यापिनी घ्यावी, दोन दिवशी प्रदोष व्यापिनी असता युग्म वाक्यावरून पूर्वा करावी. आणि ", गोवत्सपूजा आणि वटपूजा ही पूर्वदिवशी करावी" असे निर्णयामृतात सांगितले आहे. हा गोवत्सद्वादशीचे ठायीं
विशेषविधि – मदनरत्न भविष्यांत –' सवत्स गाई वत्स तुल्य वर्णाची उत्तम स्वभावाची बहुत दूध देणारी अशी आणून तिला चंदनादि यांनी लेप करून पुष्पमाळांनी पूजन करावे, आणि ताम्रपात्रामध्यें पुष्प, अक्षता, तिल यांनी अर्घ्य करून पायांजवळ पुढील मंत्राने द्यावे. तो मंत्रः---
क्षीरोदार्णवसंभृते सुरासुरनमस्कृते । सर्वदेवमये मातगृहाणार्घ्य नमो नमः ॥ नंतर माषादिकानें केलेले बटक गाईस यावे. देण्याचा मंत्रः सुरभि त्वम जगन्मातदेवि विष्णुपदे स्थिता ॥ सर्वदेव- मये ग्रासं मया दत्तमिमं ग्रस ॥ नंतर प्रार्थना करावी. प्रार्थनामंत्रः -- ततः सर्वमये देवि सर्वदेवैरलंकृते । मातर ममाभिलशीतम सफलं कुरु नंदिनी ॥ तसेच त्या दिवशी तेलात तळलेला, स्थालीत शिजलेला पदार्थ आणि गाईचे दूध, तूप, दही, ताक ही वर्ज्य करावी."
ज्योतिर्निबंधांत नारद-द्वादशी पासून कार्तिकशुद्धप्रतिपदेपर्यंत पांच दिवस पूर्वरात्री मनुष्यांस निरांजन विधि सांगितला आहे तो असा देव, गाई, घोडे, श्रेष्ठ श्रेष्ठ, लहान या सर्वांस मातृप्रमुख स्त्रियांनी नीराजन (दिवे ओवाळणे)." निर्णयामृतांत स्कांदांत - "कार्तिक कृष्णपक्षी त्रयोदशीचे दिवशी प्रदोषकाळी घरा बाहेर यमाला दीप द्यावा, तेणेंकरून अपमृत्यूचा नाश होतो."
त्याचा मंत्र:- "मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामया सह ॥ त्रयोदश्यां दीपदानात्सूर्यजः प्रीयतां मम."
Comments