top of page
Search

अथविजयादशमी

अथविजयादशमी

अथविजयादशमीसा परदिने एवापराह्न व्याप्तौपरा दिनद्वये पराक्षव्याप्तौ दिन द्वयेपिश्रवणयोगेस त्यसति वापूर्वा एवंदिनद्वये पराहन्याभावेपि श्रवणयोग- सवासवयोः पूर्वव दिनद्वयेपराहन्यातच व्यासचीरे कतरदिने श्रवणयोगयहिने श्रवणयोगः सैवग्राह्मा एवमपरा देशव्याप्तावृद्यम् यदापूर्वदिनएवापराव्या- साप दिने च श्रवणयोगाभावः तदापिपूर्वैव यदातु पूर्वदिने वापराव्यापिनीपर- दिने च मुहूर्तच्या दिव्यापिनी अपराह्नात्पूर्वमेव समाप्तापरचैव श्रवणयोगवतीतदा परैव अपराहृदशम्यभावेऽपि यतिथिसमनुप्राप्य उदययातिभास्करत्यादि साकल्यवचनैः श्रवणयुक्तायाग्राह्या या औदायिकस्वल्पदशम्याः कर्म कालेसल्वा- पादनात् सिन्धौतुइदं परदिनेपराहूकालेश्रवणसत्वेपुव श्रवणस्याप्यपराह्ना- त्पूर्वमेव समाप्तौ तु पूर्वैवेत्युक्तम् युक्तंचतत् यदापुर दिने वापराहृव्यातिः पूर्वदिने एवापराद्वात्परत्र सायाह्नादौ श्रवण योगस्तदा तुप रैवयाचे तिमय प्रतिभाति अत्रा पराजितापूजनं सीमोल्लङ्घनं शमीपूजनं देशान्तरयात्रार्थिनांमस्थानंच विहितम् तत्पूजा प्रकारस्तु अपराह्न प्रामादीशान्यां दिशि गत्वाशु चिदेशे भुवमुपलिप्यचन्दनादिनाष्टदलमालिख्यममसकुटुम्बस्यक्षेयसिद्ध्यर्थं अपराजिता पूजनं करिष्य इतिसंकल्प्य मध्ये अपराजितायै नमइत्यपराजितामाबाबतदक्षिण क्रियाशक्त्यै नमइतिजयां वामतः उमायैनमइतिविजयांचा वाथ अपराजितायैनमः जयायै नमः विजयायैनमः इतिनाममन्त्रैः षोडशोपचारां पूजां कृत्वा पार्थयेद इमां पूजांमपादे वियथाशक्ति निवेदिताम् । रक्षातुममादाय स्वस्थानमुत्तमम् १ इति अथराज्ञः संकल्प यात्रायां व जयसिद्धयर्थमितिविशेषः पूजानमस्का रान्ते हारेणतुविचित्रेणभास्वत्कनकमेखला । अपराजिता भट्टरताकरो- विजयंम १ इत्यादिमन्त्रैर्विजयंमार्थ्यपूर्व व द्विसृजेदितिसंक्षेपः ततः सर्वे जनाः ग्रामाद्ध हिरीशानदिगवस्थित शर्मागत्वा पूजयेयुः सीमोल्लङ्घनंनुशमीपूजनात्पू- पथाद्वाकार्यम् राजा अश्वपारु सपुरोहितः सामात्यः शमामूलंगवावाहनाद वरुद्ध स्वातवाचनपूर्वकं शमीसंपूज्यकार्यादेशानयात्यैः सहसंवदन्प्रदक्षिणांकुर्या तू पूजामकारस्तु ममदुष्कृतामच्छादिनिरासार्थमार्थयात्रायांविजयार्थ

शमीपूजांकरिष्ये.

शम्यलाभे अझमन्तकक्षपूजां करिष्येतिसंकल्पः राजातुशमीमून लेदिवपालपूजांवास्तुदेवतापूजां चकुर्यात् अमङ्गलानांशमनीशमन दुष्कृतस्यच । दुःखप्रणाशिनीधन्यांमपये ऽशमशुभाम् १ इतिपूजामन्त्रः पूजान्ते शमीशम- पाशमी लोहितकण्टका परित्र्यर्जुनवाणानां रामस्यप्रियवादिनी १ कु रिष्यमाणयात्रायांयथाकालंसुखमया । तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिते २ इतिमार्थयेत् अश्मन्तकपूजने अमन्तकमहामहादोष निवारण । इष्टानां दर्शनंदेशित्रूणांच विनाशनम् १ इतिमार्थयेत् राजाशतमूर्ति कृत्वाशस्त्रेणवि येत् प्राकृता शमीशाखादिछत्वा आनयन्ति निर्मूलम् गृहीत्वा साक्षतामाद्री शमीमूलगतांमृदुम् । गीतवादित्रनिर्घोषैरानयेत्स्वगृहंमति १ ततो भूपणवस्त्रा दिधारयेत्स्वजनैःसहः । नीराज्यमानः पुण्याभिर्युवतीभिः सुमङ्गलम् २ इति अत्रदेशान्तरं जिगमिषुभिर्विजयते चन्द्रायानुकूल्या भावेऽपि प्रयाणं कार्यम् तंत्रविजयमुहूर्तोद्विविधः ईपत्संध्यामतिक्रम्य किंचिदद्भिन्नतारकः । विजयो नामकालोयं सर्वकार्यार्थसाधकः । इत्येकः एकादशमुहूतपिविजयः परिकी- र्तितः । तस्मिन्त्सर्वैर्विधातव्यायात्राविजयकाङ्क्षिभिः १ इत्यपरः उक्तद्वयान्य- तर मुहूर्ते दशमी युक्तमस्थानं कार्यनत्येकादशीयुक्त आश्वयुक्शुक्रदशमीविजया- ख्याखिलेशुभा । प्रयाणेतुविशेषेणकिंपुनः श्रवणान्विता १ इति ज्योतिर्ग्रन्थो क्तेरन्यान्यपिकर्माणिमास विशेष निरपेक्षाण्यव चन्द्रायानुकूल्या भावेप्यनुष्ठेया- नि मासविशेषेविहितानितुचूडाकर्म विष्ण्वादिदेवतामतिष्ठादीनि कुर्यात् रा झपट्टाभिषेकेनवमीविद्धादशमी श्रवणयुतापिनग्राद्या कित्वादयिक्येवग्राह्या ।

विजयादशमी

विजयादशमी दुसऱ्या दिवशीं अपराह्णव्याप्ति असेल तर दुसन्या दिवसाची घ्यावी. दोन दिवस अपराहृव्यामि असेल व दोन्ही दिवस श्रवण योग असेल अथवा दोन्ही दिवस नसेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. दोन्ही दिवस अपराह्णव्याप्ति याप्रमाणे नसेल आणि श्रवण योग असेल अथवा नसेल तरी पूर्व दिवसाची घ्यावी. दोन दिवस अपराह्णव्याप्ति असेल अथवा दोन्ही दिवस नसेल आणि त्यापैकी एक दिवस श्रवण योग असेल तर ज्या दिवशीं श्रवण योग असेल त्या दिवसाची घ्यावी. याप्रमाणेच अपरहणकाली एकदेशव्याप्ति असतां निर्णय जाणावा. जेव्हां पूर्व दिवशीच अपराहूण- व्याति असेल आणि दुसऱ्या दिवशी श्रवण योगाचा अभाव असेल तेव्हांही पूर्व दिवसाची घ्यावी. जेव्हां पूर्वदिवशींच अपराह्णव्याप्ति असेल व दुसया दिवशी सहा घटिका इत्यादि व्याप्ति असून व अपराह्णापूर्वीच समाप्त होत असेल आणि त्या दिवशी श्रवण योग असेल तेव्हां दुसन्या दिवसाची प्यावी. कारण अपराहूणी जरी व्याप्ति नाहीं तरी "ज्या तिथीसह सूर्य उदय पावतो ती तिथि संपूर्ण होय" इत्यादि साकल्यवचनांनी ग्राह्य अशी जी उदयकाली असलेली स्वल्प दशमी ती श्रवण- युक्त असेल तर कर्मकाली आहे असें प्राप्त होते; अवएव ती प्राथ होय. निर्णयसिंधूमध्यें, दुसन्या दिवशी अपराह्णकाली श्रवणनक्षत्र असेल तरच दुसऱ्या दिवसाची घ्यावी, श्रवण देखील अपराहूणा- च्या पूर्वी समाप्त झाले असेल तर पूर्व दिवसाचीच घ्यावी असे सांगितलें आहे व हे योग्य आहे. जेव्हां केवल दुसन्या दिवशीच अपराहूणव्याप्ति असेल आणि केवल पूर्व दिवशींच अपराहूणानंतर सायाहून इत्यादि काली श्रवणयोग असेल तेव्हां दुसन्या दिवसाचीच घ्यावी असे मला वाटतें. या विजयादशमीचे दिवशीं अपराजिता देवीचें पूजन, सीमोल्लंघन शमीपूजन, देशान्तरी यात्रा प्रस्थान ही करावी असे सांगितले आहे. या पूजेचा प्रकार अपरहणकाली गावाच्या ईशान्य दिशेला जाऊन शुद्ध स्थानी जमीन सारवून गंध इत्यादिकाने अष्टदल काढून मम सकुटुंबस्य " क्षेमसिद्धच अपराजितापूजनं करिष्ये असा संकल्प करून मध्यभागी अपराजितायै नमः या मंत्राने अपराजितादेवन करावे. तिच्या दक्षिणभागी “क्रियाशक्त्यै नमः" या मंत्रानें जया देवी भवादन करावे. यामागी "उगाये नमः" या मंत्राने विजयादेवीचे आवाहन करा- . नंतर "अपराजिता नमः जयाय नमः विजयायै नमः " या नाममंत्रांनी षोडशोपचार पूजा करून प्रार्थना करावी ती अशी-" इस पूजा मया देवि यथाशक्ति निवेदिताम् । रक्षार्थ तु समादाय मजस्य स्थानमुत्तमम् ॥ " राजाने संकल्पामध्ये “यात्रायां विजयसिद्ध्यर्थम् " असा विशेष क्षणावा. पूजा व नमस्कार केल्यानंतर " हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला । अपरा जिता भद्ररता करोतु विजयं मम । " इत्यादि मंचांनी विजयाची प्रार्थना करून पूर्ववत् विसर्जन करावें. याप्रमाणे संक्षेप जाणावा. नंतर सर्व जनांनी ग्रामाण्या बाहेर ईशान्य दिशेला असलेल्या शमी वृक्षाप्रत गमन करून त्याची पूजा करावी. सीमोल्लंघन करण से शमीपूजनाचे पूर्वी अथवा नंतर करावे. राजानें अश्वावर आरोहण करून पुरोहित, अमात्य यांसह शमवृक्षाचे मूलापत जाऊन वाहनावरून खाली उतरावं. पुण्याहवाचन करून शमीची पूजा करावी. कार्याचे उद्देश अमात्यांसह उच्चारीत प्रदक्षिणा करावी. पूजेचा प्रकार- "मम दुष्कृतामङ्गलादिनिरासार्थं क्षेमार्थ यात्रायां विजयार्थं च शमीपूजां करिष्ये " शमी न मिळेल तर "अश्मन्तकवृक्षपूजां करिष्ये" असा संकल्प करावा. राजानें शमीचे मूळी दिक्पालांची व वास्तुदेवाची पूजा करावी. 'अमङ्गलानां शमनी शमनी दुष्कृतस्य च । दुःस्वप्रणाशिनीं धन्यां प्रपद्येऽहं शमीं शुभाम् ॥' या मंत्राने पूजा करावी. पूजा झाल्यानंतर “शमी शमयते पापं शमी लोहितकंटका । धरिष्यर्जुनवाणानां रामस्य प्रियवादिनी ॥ करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मया । तत्र निर्विशकर्त्रीीं त्वं भवश्रीरामपूजिते ।" याप्रमाणे प्रार्थना करावी. अश्मंतकाचे पूजन असेल तर "अश्मंतक महावृक्ष महादोषनिवारण । इष्टानां दर्शनं देहि शत्रूणां च विनाशनम् ।। " अशी प्रार्थना करावी. राजाने शत्रूची प्रतिमा करून शस्त्रानें छेदावी. प्राकृत लोक शमीच्या फांद्या तोडून आणतात त्याविषयीं कोठें आधार नाही. "शमीमुलाची गाई मृत्तिका अक्षतायुक्त घेऊन ती गीत वाघ यांच्या निर्घोषामध्ये आपल्या घरी आणावी. नंतर अलंकार, बलें इत्यादि स्वजनांसहवर्तमान धारण करावी. सौभाग्यवती स्त्रियांनी नीरांजन ओवाळल्या- वर घरांत यावें. देशान्तराला जाणारांनी विजय मुहूर्तावर चंद्र इत्यादि अनुकूल नसेल तथापि गमन करावें. हा विजय मुहूर्त दोन प्रकारचा आहे. ( १ ) किंचित् संध्याकाल टाकून नक्षत्रे किंचितही हग्गोचर होऊं लागली असता जो काल तो विजयकाल होय. हा सर्व कार्याची सिद्धि देणारा आहे. हा पहिला प्रकार झाला. ( २ ) अकरावा मुहूर्त हा देखील विजयकाल होय. विजयाची इच्छा करणान्या सर्वांनी या मुहूर्तावर प्रयाण करावं हा दुसरा प्रकार. या दोहोंपैकी दशमीनें युक्त अशा एका मुहूर्तावर प्रस्थान करावें; एकादशीयुक्त मुहूर्तावर करूं नये. " आश्विन शुक्ल दशमी हिला विजयादशमी ह्मणतात, ही सर्व कर्माविषयीं शुभ आहे. प्रयाणाविषयीं तर विशेष शुभ आहे. श्रवणनक्षत्राने युक्त असेल तर महान योग आहे " असे ज्योतिषग्रंथांमध्ये वचन असल्यामुळे अमुकच महिन्यांत करण्याबद्दल ज्यांचा निर्बंध नाहीं अशीं इतर कर्मे देखील चंद्रादिक अनुकूल नसतांही या दिवशी करावी. चूडाकर्म, विष्णु इत्यादि देवतांचे प्रतिष्ठापन वगैरे जीं कमें विशेष मासांत करावी असे सांगितलें आहे ती मात्र या दिवशीं करूं नयेत. राजांच्या पट्टाभिषेकाविषयीं नवमीविद्ध दशमी -- श्रवणयुक्त असली तरी न घेतां सूर्योदयीं व्याप्ति असणारीच घ्यावी.


14 views0 comments
 • Blogger
 • Tumblr
 • TikTok
 • Snapchat
 • Pinterest
 • Telegram
 • Gmail-logo
 • Instagram
 • facebook
 • twitter
 • linkedin
 • youtube
 • generic-social-link
 • generic-social-link

Join us on mobile!

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.