Shree Lakshmi Pujan 31 October श्रीं लक्ष्मी पूजन 31 ऑक्टोबर
आश्विन कृष्ण चतुर्वशी गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजीच श्रीलक्ष्मीपूजन करणे
Beschrijving van de dienst
श्रीलक्ष्मीपूजन गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ या वर्षी आश्विन कृष्ण चतुर्दशी गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी चतुर्दशी दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांनी संपत आहे व त्यानंतर अमावास्या आरंभ होत आहे. आश्विन कृष्ण अमावास्या शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी अमावास्या ६ वाजून १७ मिनिटांनी संपून नंतर प्रतिपदा आरंभ होत आहे. धर्मसिंधू, निर्णयसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, कृत्त्यसंग्रह इत्यादि ग्रंथानुसार - १) अमावास्या सूर्योदयाला आरंभ होऊन सूर्यास्तानंतर १ घटीका (२४ मिनिटे) पेक्षा जास्त प्रदोषव्यापिनी अथवा त्याहून जास्त रात्रव्यापिनी असेल तर त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे. २) जर दोन्ही दिवशी प्रदोषकाळ व्याप्ती नसेल तर दुसऱ्या दिवशी घ्यावे. ३) पुरुषार्थ चिंतामणी मते पूर्व दिवशीच प्रदोषव्याप्ती असेल व दुसऱ्या दिवशी ३ प्रहराहून अधिक अमावास्या असेल तर श्रीलक्ष्मीपूजन दुसरे दिवशी करावे. याचे खंडन धर्मसिंधूकारांनी केले आहे की दोन दिवस प्रदोषव्याप्ती नसेल तर दुसरे दिवशी लक्ष्मीपूजन करावे. दुसरे दिवशी भारताच्या पश्चिम टोकाकडील शहरामध्ये दिनांक १ नोव्हेंबर २४ रोजी सूर्यास्त ६।१७ ला होत आहे व पूर्वटोकाकडील शहरामध्ये सूर्यास्त दुपारी ४।३३ ला होत आहे. म्हणजे पश्चिमेकडे १ नोव्हेंबरला प्रदोषकाळ (म्हणजे सूर्यास्तानंतर २ तास २४ मिनिटे) १ घटके (१ घटका = २४ मिनिटे) पेक्षा कमी येत आहे व पूर्वेकडे प्रदोषकाळ १ घटकेपेक्षा जास्त मिळत आहे. म्हणजे जेथे सूर्यास्त सायंकाळी ५/५३ पूर्वी होत असेल (नागपूर, नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ आंध्रप्रदेश व पूर्वेकडील राज्ये) तेथे १ नोव्हेंबर व जेथे सूर्यास्त सायंकाळी ५।५३ नंतर होत असेल (कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, पैठण, पंढरपूर, सोलापूर, गोवा, केरळ, गुजराथ, राजस्थान) तेथे ३१ ऑक्टोबरला श्रीलक्ष्मीपूजन येत आहे. याचा अर्थ असा की श्रीलक्ष्मीपूजन दोन दिवसांत विभाजन करावे लागेल. संपूर्ण भारतामध्ये दिनांक ३१ ऑक्टोबरला पूर्ण प्रदोषकाळ मिळत आहे. या दिवशी एकवाक्यता होत आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर ला कराडचा सूर्यास्त सायंकाळी ५/५८ ला आहे म्हणजे सूर्यास्तानंतर संपूर्ण ६ घटीकेहून जास्त (२ तास २४ मिनिटे) प्रदोषव्यापिनी अमावास्या मिळत आहे. १ नोव्हेंबर रोजी अमावास सायंकाळी ६।१७ पर्यंत आहे व सूर्यास्त सायंकाळी ५।५८ ला होत आहे. म्हणजे १ नोव्हेंबरला प्रदोषकाळ फक्त १९ मिनिटे मिळत आहे. तसे पाहता सुमारे ६०% महाराष्ट्रात दुसरे दिवशी प्रदोषकाळाला अमावास्या १ घटिकेहून कमी येत असल्याने दि. ३१ ऑक्टोबर रोजी श्रीलक्ष्मीपूजन करणे योग्य ठरेल. म्हणून आम्ही रुईकर पंचांगामध्ये विनांक ३१ ऑक्टोबर २०२४ ला श्रीलक्ष्मीपूजन विले आहे. कलकत्यामधून प्रसिद्ध होणारे इंडियन नॉटिकल अल्मनक (राष्ट्रीय पंचांग) हे भारत सरकारकडून प्रसिद्ध होते, त्यामध्ये श्रीलक्ष्मीपूजन गुरुवार दि. ३१/१०/२४ रोजी आहे.
Annuleringsbeleid
No refund on cancellation
Contactgegevens
+917875032009
vedmatagayatri4@gmail.com
Vrindavan Apartment No 506, Aanandghan Bulding, Garmal, Dhayari, Pune, Khadewadi, Maharashtra 411041, India