top of page
Search

Satyanarayan Puja in Marathi सत्यनारायण पूजा मराठी हिंदू धर्म परंपरेतील एक व्रत पूजा

Updated: Nov 16, 2023

Satyanarayan Puja in Marathi सत्यनारायण पूजा मराठी

हिंदू धर्म परंपरेतील एक व्रत पूजा

इतिहास 

या पूजेचा उल्लेख प्रथम स्कंद पुराणात, रेवा कांडा येथे सुता पुराणिकने नैमिषारण्यातील ऋषिनि केला आहे. तपशील कथेचा भाग आहे जे सहसा विधी दरम्यान वाचले जातात

कमळावर बसलेल्या नारायणाची एक चित्र सोबत ठेवत हा विधी केला पाहिजे.

श्री सत्यनारायण पूजा ही गुजरात, महाराष्ट्र, आसाम, बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, ओडिशा, मणिपूर यासह भारतातील बऱ्याच भागांमध्ये एक लोकप्रिय प्रथा आहे.

ही पूजा सामान्यत: प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, एकादशी (पौर्णिमेच्या किंवा अमावास्येच्या 11 व्या दिवशी) वा अन्य शुभ दिवशी केली जाते.हे विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी, परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील केले जाते. या प्रसंगांमध्ये विवाह, पदवी, नवीन नोकरीची सुरुवात, नवीन घर खरेदी, काही नावे समाविष्ट असू शकतात. सत्यनारायण पूजा कोणत्याही कारणास्तव कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. ही पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादीत नसून पौर्णिमा (पौर्णिमेचा दिवस) विशेष म्हणजे या पूजेसाठी अतिशय शुभ मानली जाते. संध्याकाळी ही पूजा करणे अधिक योग्य मानले जाते. तथापि, एखादी व्यक्ती सकाळी ही पूजा देखील करू शकते.

पूजेचे स्वरूप

या व्रताला सत्यनारायणव्रत असे म्हणतात. हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते.या व्रताचे फल हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतति देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे, हे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतर दोन तासांत) सत्यनारायणाचे पूजन करावे.महाराष्ट्रात ही पूजा वैयक्तिक व सार्वजनिक रीत्याही करतात.श्रावण महिन्यात अनेक कुटुंबात ही पूजा करण्याची प्रथा आहे.या व्र्ताचा विधी असा-या व्रतात सत्यनारायण हे मुख्य दैवत असून सूर्यादी नवग्रह देवता ,गणपती, गौरी,वरुण, अष्टदिक्पाल ,लोकपाल इ.परिवार देवता आहेत.म्हणून या मांडावळीत मध्यभागी तांदूळाच्या किंवा गव्हांच्या राशीवर उदकयुक्त कलश ठेवून त्यात दूर्वा,पंचपल्लव,सुपारी,सोन्याचे नाणे इ. घालतात व त्याच्यावर पूर्णपात्र ठेवतात.पूर्णपात्रात सत्यनारायणाची प्रतिमा किंवा शालिग्रामशिला वा बाळकृष्णाची मूर्ती किंवा नारळ ठेवतात.नंतर सत्यनारायणाची षोडषोपचारे पूजा करतात.सव्वा शेर गव्हाचा किंवा तांदूलाचा रवा ,तेवढेच तूप ,केळे,दूध,साखर किंवा गूळ या सर्वांचा शिरा करतात.आणि त्याचा नैवेद्य दाखवितात.पूजा झाल्यावर व्रतकर्ता कथा श्रवण करतो. त्यानंतर पोथीची पूजा व कथावाचकाची पूजा करून दक्षिणादान देऊन पूजा समाप्त करतात.

पूजा व व्रतामागील आशय व हेतू 

श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे.काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण,पूजन करणे,तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे,हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे.मनाला उभारी,प्रसन्नता वाटेल,श्रद्धा निर्माण होईल,पुरुषार्थाची उपासना करण्याची प्रेरणा जागृत होईल असे सत्यनारायण पूजेचे स्वरूप असले पाहिजे.


आख्यायिका

सत्यनारायणाची कथा स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आली आहे. श्रीगजाननाय नम:| आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनक आदि ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सूतांना प्रश्न विचारला ॥१॥ ऋषी विचारतात, "हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा." ॥२॥ सूत सांगतात, "मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान्महाविष्णूंना विचारला त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हांला सांगतो. शांत चित्ताने ऎका. ॥३॥ एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्यलोकांत आले. ॥४॥ आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून ॥५॥ कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील, हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले. ॥६॥ त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला." ॥७॥ नारद म्हणाले, "ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो." ॥८॥ ॥९॥ नारदमुनींनी केलेली स्तुती ऎकून भगवान्विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, "मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मी त्याचे समर्पक उत्तर देईन." ॥१०॥ नारद म्हणाले, "हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत." ॥११॥ नारद म्हणाले, "हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे."॥१२॥ भगवान् म्हणतात, "हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूजे जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. ॥१३॥ हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. ॥१४॥ या खेरीज अनेक प्रांतात सत्यनारायणाच्या विविध कथा प्रचलित आहेत.


Shravan Vrat : विशेषतः श्रावणात सत्यनारायण पूजा का करावी? त्यामुळे होणारे लाभ जाणून 

Satyanarayan Puja Benefits : हे व्रत घरच्या घरीसुद्धा करता येते आणि सार्वजनिक सुद्धा; ते केले असता मिळणारे अगणित लाभ जाणून घ्या!

Shravan Vrat : विशेषतः श्रावणात सत्यनारायण पूजा का करावी? त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!

आपल्याला आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावे लागते. अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे “सत्यनारायण व्रत''.  घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातील हे एक! ह्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच पण जगायला बळ मिळते. कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर  मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांना दिसू लागेल. सत्यनारायण पूजेचा विधी आणि महत्त्व याबद्दल माहिती देत आहेत पंडितजीपुणे

उपासना आणि व्रत 

विवाह झाल्यावर सत्यनारायण पुजावा आणि मग कुल देवतेचे दर्शन घेवून संसाराला सुरवात करावी  अशी रूढी परंपरा आहे.  श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्य नारायणाची पूजा केली जाते . मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते, ती विशेषत: श्रावणात केली जाते. श्रावण मास हा पुण्यसंचयाचा. त्यादृष्टीने सत्यनाराण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते. त्यामुळे लाभ काय होतात तेही जाणून घेऊ. 

सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरुपातही केली जाते. हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगुन शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याचीदेखील परंपरा आहे . घरातील जी व्यक्ती  हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते. 

विधी – घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग /पाट मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे. त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा . त्यात पैसा फुल घालावे. त्यावर एक ताम्हन ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे. ह्यात तुळशी पत्राचे आसन करून त्यावर  आपल्या देवघरातील श्री कृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी . श्रीकृष्णाला  १०८, १००८ अशा संख्येत तुळस अर्पण करावी. पूजेत मन एकाग्र व्हावे, त्यासाठी हा मोठा आकडा दिला आहे.  तुळस अर्पण करून फुल वाहावीत. केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते, मांगल्य आणि पावित्र्य जाणवते. परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवू नये. 

सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थ प्रसाद द्यावा. त्याबरोबर न्याहारीची डिश, पेय, सरबतं या ऐच्छिक बाबी आहेत. त्यावर जास्त खर्च होणार असेल तर ते टाळा आणि सत्यनारायण पुजेहा आनंद घ्यावा. श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून  त्याला गंध, अक्षता फुलं आणि तुळस अर्पण करावे. 

आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी .धूप दीप उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे.  सत्यनारायण व्रत पोथी मिळते (संपूर्ण चातुर्मास ह्यातसुद्धा आहे ) त्यातील  सत्यनारायण कथेचे वाचन करावे . आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा, त्यात केळे घालावे. त्या दिवशी घरात जो काही स्वयपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा. तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या मुखी लागावा, जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल. 

दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली कि मूर्तीवर अक्षता वाहून “ पुनरागमनायच “ असे ३ वेळा म्हणावे आणि श्री कृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा. 

हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे  त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे. वरील  व्रत आणि उपासना करताना त्यातील रहस्य आणि स्वारस्य असे आहे की आपण करत असलेल्या व्रताची , उपासनेची  कुठेही वाच्यता करायची नाही .कुठेही अवाक्षर सुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होयील हे ध्यानी असुदे. नाहीतर कर्णोपकर्णी झाले तर त्याचे महत्व कमी होऊन फळ पदरात पडणार नाही. त्यात सातत्य ठेवावे. 

उपासनेचे  महत्व अनन्यसाधारण आहे . त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य,  प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते .फक्त त्यात समर्पणाची भावना हवी. साधेपणा हवा. अहंकाराचा लवलेशही नको. तरच ती पूजा फलद्रुप होईल. 


9 views0 comments

Recent Posts

See All

Dattatreya दत्तात्रेय

Dattatreya दत्तात्रेय दत्तात्रेयहा लेख भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी श्रीदत्तात्रेय याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, दत्त (निःसंदिग्धीकरण).दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी असून हिंदू

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
 • Blogger
 • Tumblr
 • TikTok
 • Snapchat
 • Pinterest
 • Telegram
 • Gmail-logo
 • Instagram
 • facebook
 • twitter
 • linkedin
 • youtube
 • generic-social-link
 • generic-social-link

Join us on mobile!

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.