top of page
Search

Dattatreya दत्तात्रेय

Dattatreya दत्तात्रेय

दत्तात्रेयहा लेख भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी श्रीदत्तात्रेय याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, दत्त (निःसंदिग्धीकरण).दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची पत्‍नी अनुसया यांचा पुत्र असून त्याला दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत.

दत्तात्रेयमराठीदत्तात्रेयसंस्कृतदत्तात्रेयःनिवासस्थानश्री क्षेत्र गाणगापूरशस्त्रत्रिशूळ, चक्रवडीलअत्री ऋषिआईअनुसयापत्नीअनघालक्ष्मीअन्य नावे/ नामांतरेदत्त, अवधूत, गुरुदेव, श्रीपाद, दिगंबरया देवतेचे अवतारश्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थया अवताराची मुख्य देवताब्रह्मा, विष्णू, महेश (शिव)मंत्रदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरूदेव दत्तनामोल्लेखगुरुचरित्र ,नवनाथ भक्तिसारतीर्थक्षेत्रेनरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वतहिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले. त्रिमूर्तीचे उल्लेख मल्लीनाथ, बाण, कालिदास इत्यादींनी तसेच शूद्रकाने केला दिसतो. आहे. दत्त्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे, अशी मान्यता आहे. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम आदी संतांनी दत्तांचया त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केला आहे..दत्तात्रेय ही तीन तोंडे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर दिसून येतो., स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते.

जन्म कथा/आख्यायिका एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात. हे तिघेही त्यांच्या आश्रमात ऋषींचा वेष धारण करून भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा म्हणून स्तनपान करण्यासाठीचे मागणी करतात. परंतु माता अनसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकांत रूपांतर करते व स्तनपान करून त्यांना जेवू घालून झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवत वर मागण्यास सांगतात. अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागते. तेव्हापासून ह्या तिघांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय होय.

दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झाले आहेत. मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे.

दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे ऋग्वेदातल्या पाचव्या मंडलातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, तर महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे पुत्र. ही दत्ताची नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत. पुराणांत वर्णन केलेल्या दत्तशिष्यापैकी यदु, आयु, अलर्क, सहस्रार्जुन व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे आहेत. उपनिषदांत उल्लेख असलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.

एक महान योगी म्हणून दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक उपास्यदैवत मानतात.

नाथ संप्रदायात 'राऊळ' अथवा रावळ या नावाने एक उपपंथ आहे. पंथाचे प्रवर्तक नागनाथ हे सिद्धपुरुष होते. या उपपंथात मुसलमान धर्मातील अनेक मंडळी उपासना करताना आढळतात. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. चक्रधरांनी दत्तात्रेयाला पूज्य मानले आहे. श्रीचांगदेव राऊळ यांना इसवी सन ११००च्या सुमारास दत्तदर्शन झाले असा लिखित उल्लेख आहे.गोरक्षनाथाने अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय हा वारकऱ्यांनाही पूज्य आहे. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.दशनामी नागा साधूंचे सहा मुख्य आखाडे आहेत. हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील एक आखाडा हा भैरव आखाडा म्हणूनही ओळखला जातो. या आखाड्याची देवता पूर्वी भैरव असावी. त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखाड्याची प्रमुख देवता आहे.

दत्ताची महाराष्ट्र/कर्नाटकातील तीर्थक्षेत्रे संपादन कराश्री क्षेत्र अक्कलकोटश्री क्षेत्र अंतापूरश्री क्षेत्र अनसूयातीर्थश्री क्षेत्र अंबेजोगाईश्री क्षेत्र अमरकंटकश्री क्षेत्र अमरापूरश्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिरश्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिरश्री एकमुखी दत्तमूर्ती (कोल्हापूर, फलटण)श्री क्षेत्र औदुंबरश्री क्षेत्र कडगंचीश्री क्षेत्र करंजीश्री क्षेत्र कर्दळीवनश्री क्षेत्र कारंजाश्री क्षेत्र कुबेरेश्र्वर (बडोदा)श्री क्षेत्र कुमशीश्री क्षेत्र कुरवपूरश्री क्षेत्र कोळंबीश्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिरश्री क्षेत्र गरुडेश्वर (गुजराथ)श्री क्षेत्र गाणगापूरश्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर (गुजराथ)श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर (पुणे)श्री क्षेत्र गुरुशिखर अबू (राजस्थान)श्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर (बडोदा)श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)श्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थानश्री क्षेत्र चौल दत्तमंदिरश्री जंगली महाराज मंदिर (पुणे)श्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिरश्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड, मुंबई)श्री क्षेत्र टिंगरीश्री क्षेत्र डभोई (बडोदा)श्री दत्तमंदिर (डिग्रज)श्री तारकेश्र्वर स्थानश्री दगडूशेठ दत्तमंदिर (पुणे)श्री क्षेत्र दत्तभिक्षालिंगश्री क्षेत्र दत्तवाडी (सांखळी गोवा)श्री क्षेत्र दत्ताश्रम (जालना)श्री क्षेत्र देवगड नेवासेश्री क्षेत्र नरसीश्री क्षेत्र नारायणपूरश्री क्षेत्र नारेश्र्वरनासिक रोड दत्तमंदिरश्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर (बडोदा)श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी)श्री क्षेत्र पवनीश्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थश्री क्षेत्र पिठापूरश्री गुरुदेवदत्त मंदिर (पुणे)श्री दत्तमंदिर रास्तापेठ (पुणे)श्री क्षेत्र पैजारवाडीश्री क्षेत्र पैठणश्री क्षेत्र बसवकल्याणश्री क्षेत्र बाचणी दत्तपादुकाश्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वरश्री क्षेत्र बाळेकुंद्रीश्री भटगाव दत्तमंदिर (नेपाळ)श्री भणगे दत्त मंदिर (फलटण)श्री क्षेत्र भामानगर (धामोरी)श्री क्षेत्र भालोद (गुजराथ)श्री क्षेत्र मंथनगडश्री क्षेत्र माणगांवश्री क्षेत्र माचणूरश्री क्षेत्र माणिकनगरमाधवनगर - फडके दत्तमंदिरश्री क्षेत्र माहूरश्री क्षेत्र मुरगोडश्री क्षेत्र राक्षसभुवनश्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिरश्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिरश्री दत्तमंदिर (वाकोला)श्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिरश्री क्षेत्र वेदान्तनगरी (दत्तदेवस्थान नगर)श्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्रश्री क्षेत्र शिर्डीश्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिरश्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिरश्री क्षेत्र शेगावश्री क्षेत्र सटाणेश्री साई मंदिर (कुडाळ गोवा)श्री क्षेत्र साकुरीश्री क्षेत्र सुलीभंजनश्री स्वामी समर्थ मठ चेंबूरश्री स्वामी समर्थ मठ दादरश्री स्वामी समर्थ संस्थान (बडोदा)श्री हरिबाबा मंदिर (पणदरे)श्री हरिबुवा समाधी मंदिर (फलटण)श्री हिंगोलीचे दत्त मंदिरउपासनेची वैशिष्ट्ये संपादन करादत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध असली तरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते.

दत्तात्रेयाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतली तीर्थक्षेत्रे.-

औदुंबर :कडगंची : कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र हे कर्नाटक राज्यात गुलबर्गा शहरापासून २१ किलोमीटरवर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.कर्दळीवन : अक्कलकोट स्वामींची बखर, गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र, इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे.कारंजा : लाड कारंजे, श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान.कुरवपूर : श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे वास्तव्य आणि पादुका.गरुडेश्वर : योगी श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांची समाधी असलेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. नर्मदा नदीच्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत.गाणगापूर : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थानसांगली पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.गिरनार हे गुजराथमधील दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. गुजराथमधल्या जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू नेमिनाथांचे मंदिर आहे. तसेच गोरखनाथ मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. तेथे कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.नरसोबाची वाडी : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थानसांगली पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो. या स्थानाल नृसिंहवाडी म्हणतात. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले. विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे आदिलशहाने या मंदिराचे बांधकाम करून दिले असे एक मत आहे.नारेश्वर : हे रंगावधूत महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र गुजरात राज्यात आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी 'दत्त बावनी' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील वडोदरापासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि गोकुळाष्टमी हे उत्सव साजरे होतात.नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर येथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्रकूटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून नेपाळमध्ये पूजले जाते.पीठापूरबसवकल्याणबाळेकुंद्रीमाणगावमाहूर : चांगदेव राऊळ हे माहूरच्या यात्रेनिमित्त फलटणहून निघाले होते. तसेच ते द्वारका येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.अक्कलकोट : स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. सोलापूरजवळ असलेल्या अक्कलकोट या गावाचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.श्रीक्षेत्र रुईभर श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर ता. जि. उस्मानाबादअंबेजोगाई : आद्यकवी मुकुंदराज आणि संत दासोपंत यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात या अंबेजोगाई येथे आहेअष्टे :कोल्हापूर : दत्तात्रेयांचे अंशावतार मानले गेलेले कुंभारस्वामी यांनी हे स्थळ आपल्या अवतार कार्यासाठी निवडले होते. स्वामींचा निवास असलेल्या कुंभार गल्लीमध्ये हे दत्तमंदिर आहे. भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.खामगाव : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे दत्त-स्थान आहे. येथे संत पाचलेगावकर महाराजांचा मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.चौल : चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये रेवदंड्यापासून ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.फलटण (सातारा जिल्हा) : येथे एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. गोंदवलेकर महाराजांनी दिलेली मूर्ती या देवळात आहे. महाराजांचे भाचे भणगे यांचे वंशज हे देवस्थान सांभाळतात.माणिकनगर : बीदर येथील हुमणाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. श्रीमाणिकप्रभू यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. अहमदाबाद येथील बाबा त्रिवेदी महाराज या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी नानासाहेब पेशव्यांनी रंगराव यांना माणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवले होते. जवळचे गुलबर्गा रेल्वे स्टेशन असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.विजापूर : विजापूरला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.सांखळी (गोवा) : डिचोली तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी रामनवमी, अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि दत्त जयंती असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्तभक्ताने या मंदिराची स्थापना केली.श्रीक्षेत्र रुईभर श्रीदत्त मंदिर संस्थान रुईभर ता. जि. उस्मानाबाद पासून १२ कि. मी. अंतरावरील गाव.शिष्य व कार्य श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी दत्तसंप्रदायाचे पुनरुज्जीवन केले, असे काहीजण मानतात. तत्कालीन मुसलमानांच्या आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे रक्षण यांनी केले.

संप्रदायाचे ग्रंथ अथर्ववेदात दत्तात्रेय उपनिषदाचा समावेश आहे.अवधूतगीता नावाचा ग्रंथ एक प्रमाणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा पावला आहे.गुरुगीतागोरक्षनाथ लिखित हिंदी रचनांचे संकलन गोरखबानी या ग्रंथात झाले आहे.श्री दत्तगुरूंनी 'दत्त संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला.दत्तप्रबोध हा ग्रंथ कावडीबुवा यांनी लिहिला.परशुरामांनी त्यावर आधारित 'परशुराम कल्पसूत्र' नावाची पन्‍नास खंडांची रचना केली.सुमेधाने या दोन ग्रंथांच्या आधाराने त्रिपुररहस्य नावाचा ग्रंथ रचला.महानुभावांच्या आद्य ग्रंथापैकी 'साती ग्रंथ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात ग्रंथातील 'उद्धवगीता' या भास्करभट बोरीकर नावाच्या एकादशटीकेत प्रारंभीच दत्तात्रेयाला नमन केलेले आहे.मुकुंदराज या आद्य मराठी कवीचे नाथपरंपरेशी जोडणारे उल्लेख आढळतात.दत्तमहिमा गाण्यासाठी लिहिलेला सैदाद्रवर्णन हा ग्रंथ आहे.दासबोधाच्या रचनेसाठी रामदास स्वामी यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते.

संबंधित ग्रंथ श्रीगुरुचरित्र लेखक सरस्वती गंगाधरदत्तप्रबोधदत्तमाहात्म्यगुरुलीलामृतनवनाथभक्तिसारनवनाथ सार - लेखक धुंडिसुत मालूदक्षिणामूर्ती संहितादत्तसंहिताआधुनिक पुस्तके आध्यात्मिक साधना पूर्वतयारी - लेखक श्री. कुलदीप निकम दत्तप्रबोधिनी प्रकाशनदत्त अनुभूती : स्वामिकृपेने घडलेल्या ११ गिरनार वाऱ्यांमधील चमत्कारिक अनुभव (आनंद कामत)दत्त संप्रदायाचा इतिहास - लेखक डॉ. रा.चिं. ढेरे पद्मगंधा प्रकाशनश्रीदत्तात्रेय ज्ञानकोश - संपादक डॉ. प्र.न. जोशी'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती' - लेखक डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशनदत्त माझा दिनानाथ (डाॅ. ॐश्रीश श्रीदत्तोपासक)गीते संपादन कराआर. एन. पराडकर या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा गायक अजित कडकडे हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे. अजित कडकडे यांनी गायलेेले प्रवीण दवणे यांचे आणखी एक गीत : 'निघालो घेऊन दत्ताची पालखी'; संगीतकार नंदू होनप.

पराडकर यांची सुप्रसिद्ध गीते अनुसूयेच्या धामी आले (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)आज मी दत्तगुरू पाहिलेकृष्णाकाठी दत्तगुरूंचा नित्य असे संचार (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)गगनिचे नंदादीप जळती (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)गुरुदत्त पाहिले कृष्णातिरींगेलो दत्तमयी होउनी (कवी गिरिबाल, संगीत शांताराम पाबळकर)जय जय दत्तराज माऊली (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)दत्तगुरूंना स्मरादत्तगुरू सुखधाम, माझा दत्तगुरू सुख धामदत्त दिगंबर दैवत माझे (कवी सुधांशु, संगीत आर.एन. पराडकर)दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनीदत्ता दिगंबरा या होदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. (कवी सुधांशु; राग यमन)धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची (पारंपरिक गीत)निघालो घेऊन दत्ताची पालखी (संगीत-सद्गुरू नंदू होनप)पुजा हो दत्तगुरू दिनरात (कवी गुलाब भेदोडकर)मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूतामाझी देवपूजा पाय तुझे (कवी शिवदीन केसरी),वगैरे. .

संदर्भ 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश'- (खंड १) (मराठी मजकूर) (इ.स. १९६८ आवृत्ती.). भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे.रा.चिं. ढेरे. 'दत्त संप्रदायाचा इतिहास' (मराठी मजकूर) (इ.स. १९९९ आवृत्ती.). पद्मगंधा प्रकाशन, पुणे. आय.एस.बी.एन. ८१-८६१७७-११९-११९ Check |isbn= value (सहाय्य).Kalelkar, Dattatraya Balakrishna (1972). Jivanta vratotsava (mr मजकूर). Rāshṭrīya Granthamālā.Jośī, Pralhāda Narahara (1974). Śrīdattātreya-jñānakośa (mr मजकूर). Surekhā Prakāśana-Grantha.

5 views0 comments

Komentáre

Hodnotenie 0 z 5 hviezdičiek.
Zatiaľ žiadne hodnotenia

Pridajte hodnotenie
  • Instagram
  • Tumblr
  • Snapchat
  • Pinterest
  • Telegram
  • Gmail-logo
  • facebook
  • twitter
  • linkedin
  • youtube
  • generic-social-link
  • generic-social-link

Download PANDITJIPUNE

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.