संस्काराचा निर्णय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.l
वेदांचें अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरूची आज्ञा घेऊन स्नान करावें, स्नान म्हणजे समावर्तन करावें. ( सम् = पूर्ण, उत्तम आवर्तन = निवृत्त होणे अर्थात् समाप्त करणें. ) ब्रह्मचारी यानें यथोक्त विद्याभ्यास यथावत् काल संपूर्ण केल्यानंतर गुरूंच्या व मातापित्रादि वडिलांच्या संमतीनें व अनुमोदनानें गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठीं स्वानुरुप वधूची योजना केल्यानंतर सामवर्तनसंस्कार करावा लागतो. सध्या स्थिति पालटली आहे, वेदाध्यायनाचा मागमूसही राहिला नाहीं. विद्यार्थी सोळा दिवस रहूद्या पण सोळा तासहि व्रतस्थ रहात नाहीं. उपनयनानंतर ब्रह्मचर्याचे कोणतेही नियम न पाळले तरी त्या नियमांच्या समाप्ती दाखल असणारा हा संस्कार करण्यांत येतो. गृहस्थाश्रमासारख्या सर्वलोकोपकारक आश्रमाचे महत्व मनावर ठसावे व आश्रमाच्या कर्तव्यांत आपल्या हातून कुचराई होऊं नये म्हणून या संस्काराचे महत्त्व फ़ार आहे. समावर्तन ( सोडमुंज ) मौंजीबंधनास सांगितलेल्या मुहूर्तावरच करावें, असें जरी आहे तरी मार्गशीर्षमासी विवाह होत असतां दक्षिणायनांत देखील सोडमुंज करावी. कारण मनुष्यानें आश्रमावाचून एक दिवस देखील राहूं नये, असा दक्षस्मृतींत निषेध सांगितला आहे म्हणून शुभदिवशीं समावर्तन करावें ब्रह्मचर्यदशेमध्यें दशाहाशौच धरण्यास कारण असा सपिंडांतील कोणी मृत असल्यास सोडमुंज केल्यानंतर त्रिरात्रींत विवाह करूं नये. कोणी मृत झाला नसल्यास हरकत नाहीं.
समावर्तन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी चौदावा संस्कार आहे. यास सोडमुंज असेही म्हणतात. उपनयनास जो काल शुभ आहे, त्याकाली समावर्तन करावे. गुरूकुलातून अभ्यास संपवून परत स्वत:च्या घरी परत येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत असत. यावेळी गुरूला दक्षिणा दिली जात असे. मुंज झाल्यावर गुरुच्या घरी शिकायला गेलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी गुरुच्या घरीच रहात असे. त्यामुळे शिक्षण संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे. या समयी गुरू आपल्या शिष्याला गृहस्थ आश्रम संबंधात श्रुतिसंमत आदर्शपूर्ण उपदेश करत असत गृहस्थाश्रम प्रवेश करण्यासाठी प्रेरित करतात.
हिंदू धर्म संस्कारातील समावर्तन हा संस्कार द्वादश संस्कार आहे. यास सोडमुंज असेही म्हणतात. ‘समावर्तन’ म्हणजेच विद्यार्जन संपवून स्वगृही परत येणे. पूर्वीच्या काळी वेदाध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरूकुलातून अभ्यास संपवून परत स्वत:च्या घरी परत येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत असत. यावेळी गुरूला दक्षिणा दिली जात असे. मुंज झाल्यावर गुरुच्या घरी शिकायला गेलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी गुरुच्या घरीच रहात असे. त्यामुळे शिक्षण संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे. या समयी गुरू आपल्या शिष्याला गृहस्थ आश्रम संबंधात श्रुतिसंमत आदर्शपूर्ण उपदेश करत असत ब्रह्मचर्यव्रताची निवृत्ती होय. यामध्ये कंबरेतील करगोटा काढून टाकतात म्हणून याला ‘सोडमुंज’ असेही संबोधले जाते.
वेदांचें अध्ययन पूर्ण झाल्यानंतर ,गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठीं स्वानुरुप वधूची योजना केल्यानंतर गुरूची आज्ञा घेऊन स्नान करावें, स्नान म्हणजे समावर्तन करावें. ( सम् = पूर्ण, उत्तम आवर्तन = निवृत्त होणे अर्थात् समाप्त करणें. )
समावर्तनानंतर विवाहापर्यंतच्या कालावधीत मुलाची गणना ‘स्नातक‘ म्हणून केली जाते . तसेच स्नाताकाने ब्रह्मचर्याश्रम व पुढे विवाह झाल्यानंतर प्राप्त होणारा गृहस्थाश्रम या दोन्ही आश्रमांतील आवश्यक नियमांचे पालन करणे त्याच्याकडून अभिप्रेत आहे.
या संस्कारात खालीलप्रमाणे विधी असतात.
१) मुहूर्ताच्या दिवशी आन्हिक आटोपल्यानंतर सकाळी पुण्याहवाचन करुन स्नातकाने स्वत: प्रधानहोम करावा. त्यानंतर न्हाव्याकडून डोक्यावरील शेंडी वगळता, सर्व केस काढून परत स्नान करावे.
२) स्नानानंतर आचमन विधी करुन उपनयनाच्या वेळी घातलेल्या खांद्यावरील एका यज्ञोपवीतात समंत्रक आणखी एकाची भर टाकावी. म्हणजेच आणखी एक यज्ञोपवीत घालावे. त्यानंतर २ नवीन वस्त्रे अंगावर धारण करावीत.
३) उपरोक्त मंत्रानुसार स्नातकाने आपल्या डोळ्यांमधे काजळ घालावे व कानांमधे कुंडले घालावीत. त्यानंतर सर्वांगास सुवासिक अत्तराचे लेपन करावे. स्वत:च्या कपाळी मुंडावळ बांधावी. गळ्यात किमान एखादा सोन्याचा मणी असलेला हार, हातात छत्री व दंड, डोक्यावर पागोटे व पायात चपला घालाव्यात. त्यानंतर देवळात देवदर्शन करुन परत घरी यावे.
४) देवळातून परत आल्यावर हात-पाय धुवून आचमन करावे, समंत्रक, होमामधे सामिधांचे हवन करावे व त्यानंतर होमकार्य पूर्ण करावे.
Comments