top of page
Search

शास्त्र असे सांगते 'वास्तुशांती' म्हणजे काय ? वास्तुशांतीची कोणकोणती अंगे व उपांगे आहेत ?

Updated: Sep 15, 2023

शास्त्र असे सांगते

'वास्तुशांती' म्हणजे काय ? वास्तुशांतीची कोणकोणती अंगे व उपांगे आहेत ?

'वास्तुशांती' हा विधी विविध अंगोपांगांनी संपन्न होतो. त्यांपैकी वास्तुशांतीच्या प्राथमिक गोष्टींमध्ये पुण्याहवाचनापर्यंतचे विधी येतात. त्यानुसार यज्ञमानाने प्रथम नूतनयज्ञोपवीतधारण, पंचगव्यमेलन व पंचगव्यप्राशन करावे. नंतर आचमन, प्राणायाम, देशकालनिर्देश, वास्तुशांतिसंकल्प, गणपतिपूजन इत्यादी करून पुण्याहवाचनास प्रारंभ करावा. पुण्याहवाचनामध्ये वरुणपूजन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध इत्यादी विधी येतात. पुण्याहवाचनानंतर आचार्यवरण (पुरोहिताची नियुक्ती) करावे.

आचार्यवरण झाल्यानंतर पुरोहित; वास्तुपीठमांडणी, रेखाकरण, वास्तुप्रतिमेचे अग्न्युत्तारण व प्राणप्रतिष्ठा, देवता-ग्रह-अग्नी ह्यांची स्थापना, अन्वाधान व पूजा इत्यादी गोष्टी करून घेतात. त्यानंतर होमास प्रारंभ होतो. त्यामध्ये पहिली आहुती (वराहुती) गणपतीस द्यावयाची असते. ही आहती यजमानाने द्यावी. त्यानंतर द्रव्यत्याग होऊन पुढील आहुत्या नवग्रहांच्या अधिदेवता, पुरोहित देतात. त्यामध्ये अन्वाधानातील उच्चारानुसार नवग्रह,

नवग्रहांच्या प्रत्यधिदेवता, क्रतुसाद्गुण्यदेवता, ऋतुसंरक्षकदेवता, शिख्यादिदेवता (४५) ह्यांचा होम झाल्यावर वास्तुदेवतेस कल्पोक्तद्रव्यांनी किमान एकशेआठ आहुत्या द्याव्यात. तथापि, वास्तू अत्यधिक विस्तीर्ण असेल तर अधिक संख्येने वास्तूच्या आहुत्या देणे हे केव्हाही चांगले. कल्पोक्तसंख्येने वास्तूला आहुत्या दिल्यानंतर वास्तुदेवतेस बेलफळाच्या किंवा बेलाच्या पानाच्या पाच आहुत्या द्याव्यात. शेवटी चरक्यादिदेवता (८) व इंद्रादिदेवता (८) ह्यांना कल्पोक्त द्रव्याने आहुत्या द्याव्यात. अशा रितीने होम संपन्न झाल्यानंतर स्विष्टकृत व प्रायश्चित्तहोम करावा. वास्तुशांतीदिवशी ग्रहमख असल्यामुळे ग्रहबलिदानदेखील करावयाचे असते. त्यानुसार ग्रहदेवता-वास्तोष्पति-क्षेत्रपालादिदेवता ह्यांच्यासाठी बलिदान करावे. बलिदानासाठी एका शिप्तरात (वेळूच्या टोपलीत) भाताचा बली करून त्यावर विविध कृष्णद्रव्ये घालावीत व तो बली यजमानासह सर्व कुटुंबीयांवरून ओवाळून तिठ्यावर ठेवावा. त्यानंतर पूर्णाहुती होऊन मुख्यहवनाचा विधी पूर्ण होतो. नंतर विभूतिधारण, अग्निप्रार्थना, स्थापितदेवता-उत्तरपूजन, यजमानावर कलशांतील जलाभिषेक, आचार्यदक्षिणाप्रदान करावे. त्यानंतर अग्निसमारोप करून आशीर्वादग्रहणापर्यंत अन्य कर्मे करावीत. अशा प्रकारे वास्तुशांतीचा मुख्यविधी संपन्न होतो. त्यानंतर ‘धरापूजन' करण्यात येते. त्या वेळी यजमानपत्नीने वास्तुनिक्षेपस्थानी धरादेवीची (भूमीची) पूजा करावी. पूजा केलेल्या ठिकाणी वास्तुनिक्षेप करण्यासाठी गर्ता (खड्डा) करून त्यामध्ये 'वास्तुनिक्षेप' केला जातो.

वास्तुनिक्षेप हे वास्तुशांतीचे एक महत्त्वाचे उपांग आहे. वास्तुनिक्षेपासाठी करण्यात येणारा गर्ता गुडघाभर खोल असावा असे शास्त्र आहे. पण सद्यःकाली असे करणे गैरसोईचे ठरत असल्यामुळे किमानपक्षी छोटी पेटी (३ इंच लांब x २ || इंच रुंद x २ इंच खोल) बसेल एवढे उकरून त्या ठिकाणी वास्तुनिक्षेप करावा व ते स्थान योग्य तऱ्हेने झाकून घ्यावे. वास्तुप्रतिमा ठेवण्यासाठी औदुंबराच्या लाकडाची पेटी वापरतात. ह्या पेटीभोवती मनशिळीचे (हे एक प्रकारचे कीटकनाशक रसायन आहे) चूर्ण विखरून टाकले जाते.

- तसेच त्या ठिकाणी पाण्याशी संलग्न अशा अनेक वस्तू ठेवल्या जातात. त्यात शैवाल

(शेवाळ)

व समुद्रवाळू ह्यांचा समावेश होतो. 'शैवाल' ही पृथ्वीवरील आद्य वनस्पती तिच्यापासूनच उत्क्रांती होत होत वनस्पतिसृष्टीची निर्मिती झाली. शैवालाचे

दूसरे

पुढे अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच नव्याने फोफावते. वास्तुप्रतिमेबरोबर पंचरत्ने व पंचधातू हेदेखील ठेवण्यात येतात. रत्नांचा व धातूंचा जन्म पृथ्वीच्या पोटातून होत असतो. त्यामुळे रत्ने व धातू हे एका अर्थाने पृथ्वीचेच प्रतिनिधित्व करत असतात. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरकणी, नीलम, लसण्या इत्यादी रत्नांपैकी हव्या त्या पाच रत्नांचे तयार संच सराफकट्ट्यावर उपलब्ध होतात. तसेच तेथे चांदी, पितळ, कांस्य, तांबे, लोह अशा धातूंचे तुकडे किंवा सर्वांचा मिळून तयार केलेला पंचधातूचा तुकडाही उपलब्ध होऊ शकतो. वास्तुनिक्षेप झाल्यावर त्या जागी अंबील व भिजाणे (भिजवलेले हरभरे) ह्या वस्तू ठेवल्या जातात. ह्या सर्व वस्तू गारवा निर्माण करणाऱ्या आहेत. वास्तुनिक्षेप झाल्यानंतर पुढे त्या स्थानी कटाक्षाने स्वच्छता ठेवावी. त्या स्थानावर मनुष्याचा वावर होणार नाही वा अन्य काही निषिद्ध वस्तू तेथे ठेवल्या जाणार नाहीत ह्याची खबरदारी घ्यावी.

तोरणबंधन हे वास्तुशांतीमधील दुसरे उपांग होय. कोणत्याही धार्मिक कार्याच्या ते वेळी मुख्य दरवाज्यावर आम्रवृक्षाच्या पानांचे तोरण बांधणे शुभदायक असून मंगलकार्याचे द्योतक असते. तोरणाच्या बाबतीत विविध प्रांतांत विविध रूढी प्रचलित आहेत. काही प्रांतांत यजमानाच्या बहिणीकडून किंवा सोयऱ्यांकडून तोरण आणण्याची प्रथा आहे. त्या वेळी तोरण आणणाऱ्यांचा वस्त्रादिकांनी सन्मान केला जातो. काही ठिकाणी हे तोरण वाजत-गाजत आणले जाते. वास्तुशांतीच्या दिवशी पुण्याहवाचनानंतर प्रथम पाच सुवासिनींकडून तोरणाची पूजा करून घेतात व नंतर ते दारावर बांधले जाते.

वास्तुनिर्मिती होत असताना व निर्मितीची पूर्तता झाल्यावर नवीन वास्तूकडे पाहताना काही लोकांची 'नजर' लागण्याची शक्यता असते, अशी समजूत आहे. अर्थात, समजुतीस भक्कम वैज्ञानिक आधार नाही हे खरे असले तरी त्यामागे काहीतरी तथ्य आहे हे अनुभवांती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे नूतन वास्तूच्या दर्शनी सर्वांना दिसेल अशा जागी काळी बाहुली उलटी टांगण्याचा प्रघात आहे. वास्तुनिर्मिती होत असताना काळी बाहुली बांधलेली नसल्यास तोरणबंधनानंतर ती दर्शनी भागी उलटी टांगावी.

• सूत्रवेष्टन हे वास्तुशांतीमधील तिसरे उपांग होय. सूत्रवेष्टनामागे वास्तूची परिमिती • निर्धारित करणे हाच हेतू असतो. हे सूत्र तीन, पाच किंवा अकरा पदरांचे असावे.

• तीन ही संख्या सत्व रज तम ह्या त्रिगुण साठी • पाच ही संख्या पंचमहाभूताची तर अकरा ही संख्या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिये व मन ह्यांचे प्रतीक समजली जाते. ह्यामध्ये प्रथम तीन / पाच / अकरा सूतगुंड्या घेऊन त्यावर गुरुजींनी अभिषेक केल्यावर पाच सुवासिनींनी गंध, हळद-कुंकू, फुले वाहून त्या सूतगुंड्यांची पूजा करावी व त्या गुंड्या • किंवा पाच पदरी दोरा केल्यावर तो घराभोवती वेष्टन करावा. फ्लॅट असेल तर तो दोरा पुरुषमंडळींकडे सुपूर्त कराव्यात. पुरुष मंडळींनी त्या गुंड्यांचे पदर एकत्र करून तीन पदशी • दर्शनी भागावर व हाताला न येईल इतक्या उंचीवर छोटे खिळे (चुका) मारून त्यास लटकवून ठेवावा. त्या दरम्यान यजमानाने आठ द्रोण घेऊन त्यांत दही-भात घालून ते द्रोण घराच्या आठ दिशांना ठेवावेत. प्रत्येक द्रोण ठेवण्यापूर्वी द्रोणाखाली जमिनीत एक खिळा ठोकून मग त्यावर द्रोण ठेवावा. वास्तुशांतीच्या दिवशी घराच्या आठही दिशांना जमिनीत

खिळे मारून क्षेत्रनिर्धारण केले जाते.

गृहप्रवेश हे वास्तुशांतीचे थेट अंग नसले तरी वास्तुशांतीच्या दिवशी गृहप्रवेश असेल तर ते कर्मांगभूत अंग मानावे लागेल. वास्तविक वास्तुशांतिविधानानुसार वास्तुशांती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विधिवत गृहप्रवेश करावयाचा असतो. पण वास्तवात वास्तुशांतीपूर्वीच अनौपचारिकरीत्या गृहप्रवेश झालेला असतो. तथापि, वास्तुशांतीच्या दिवशी गृहप्रवेश योजला असल्यास पुरोहितांनी काढून दिलेल्या सुमुहूर्तावर औपचारिक गृहप्रवेश करावा. गृहप्रवेशाचे वेळी घरातील सर्वांनी घराबाहेर येऊन थांबावे. मुख्य यजमानाने आपल्या हातात देवाचे ताह्मण घेऊन उभे राहावे व त्याच्या पत्नीने प्रथेनुसार नारळ ठेवलेली जलपूर्ण कळशी कडेवर वा मस्तकावर घेऊन यजमानाच्या उजव्या बाजूस उभे राहावे. नंतर गुरुजींकडून विविध मंगलसूक्तांचा घोष होत असताना त्या दरम्यान घराच्या विस्ताराच्या मानाने एक, तीन वा अधिक संख्येने गृहप्रदक्षिणा कराव्यात. त्या वेळी चौघडा, सनई इत्यादी वाजंत्री वाजवण्याची प्रथा आहे. वाजंत्री नसेल तर झांज, टाळ, घंटा इत्यादी वाद्ये वाजवली तरी चालतात. वास्तूभोवती घंटावादन करत प्रदक्षिणा केल्यामुळे अनिष्ट शक्ती दूर पळतात. नंतर यजमानाने सपत्नीक पुढे होऊन अन्यजणांसह मुख्य प्रवेशद्वाराशी येऊन उभे राहावे व निर्धारित मुहूर्तावर यजमान व यजमानपत्नी ह्यांनी उजवा पाय उंबऱ्याच्या आत ठेवून गृहप्रवेश करावा. काही प्रांतांत त्या वेळी शंख वा तुतारी वाजवण्याची प्रथा आहे.

परिमिती वि

तर र पाच

दोरा

त्यास द्रोण

1,

खळा

नीत

HIR

वास्तुशास्त्र

'वास्तुशांती' म्हणजे विवाह, मुंज ह्यांच्यासारखाच एक सोहळा समजण्यात येतो. त्यास अनुसरून आजकाल वास्तुशांतीच्या दिवशी अहेरांची देवघेव, जेवणावळी, भेटीगाठी इत्यादी गोष्टी घडतात,

व वास्तुशांती

990,

वास्तुशांतीला सोहळ्ळ्याचे स्वरूप आल्यामुळे

• साहजिकच यजमानांचे लक्ष मुख्य विधीपासून ढळते आणि आयोजित केलेल्या सोहळ्याचे नियोजन व अतिथींचा पाहुणचार ह्यांमध्येच तो गुंतून पडतो. त्या वेळी त्याची द्विधा मनःस्थिती झाल्यामुळे वास्तुशांतीच्या अंगोपांगांकडे लक्ष देण्यासही त्याला फुरसत • मिळत नाही. ह्यातून सुटका होण्यासाठी तो वास्तुशांतीच्या अंगोपांगांचा व्याप गुरुजींवर सोपवून मोकळा होतो. पुण्याहवाचन होताच आचार्यवरणाची सुपारी देऊन मोकळ्या झालेल्या यजमानास वराहुती, द्रव्यत्याग, पूर्णाहुती, अग्निसमारोप, अभिषेक, श्रेयोदान, श्रेयोग्रहण, दक्षिणादान, आशीर्वादग्रहण इत्यादी अटळ कार्यांसाठी मोठ्या मिनतवारीने बोलावून घ्यावे लागते. इकडे गुरुजी मंत्र पुटपुटत असतात, तर तिकडे यजमान ‘आटपा ! आटपा !!' चा जप करत असतो. त्यामुळे सद्यःकाली वास्तुशांतीच्या अंगोपांगांची सविस्तर माहिती यजमानाला कधीच होऊ शकत नाही. ज्या घरात आपण दीर्घकाळ वास्तव्य करणार आहोत, ज्या घरात राहून आपण जीवनक्रम व्यतीत करणार आहोत व ज्या घरात आपली मुले लहानाची मोठी होणार आहेत त्या घराची वास्तुशांती घिसाडघाईने कशीबशी आटोपून; जेवणावळीत व अहेरांच्या देवघेवीत गुंतून पडणे हे क्षणैक सोयीचे वाटले तरी दीर्घकालीन आपल्याच स्वास्थ्यहानीला कारणीभूत ठरणारे असते. हे सर्व टाळावयाचे असेल तर एकच मार्ग म्हणजे वास्तुशांतीच्या दिवशी घरातील मंडळींखेरीज अन्य कोणाही बाहेरच्या मंडळींना निमंत्रण न देता वास्तुशांती झाल्यावर अन्य कोणत्याही सोयिस्कर दिवशी सत्यनारायणासारखी महापूजा आयोजित करावी व त्यानिमित्ताने ह्या लोकांना आमंत्रित करावे.

अशा प्रकारे वास्तुशांतीच्या विधीची अंगोपांगे लक्षात घेऊन वास्तुशांती केल्यास तिचा हेतू खऱ्या अर्थाने सफल होऊन यजमानास ऐहिक व पारमार्थिक लाभ होतात.

फ्लॅटची वास्तुशांती करताना सूत्रवेष्टन, वास्तुनिक्षेप, दिशानिर्धारण इत्यादी अंगोपांगे कशी आयोजित करावीत? ती वगळली तर चालतात का ?

उत्तर : वास्तुशांतीचा प्रयोग हा आजूबाजूला भरपूर मोकळी जागा असलेल्या बैठ्या घरास लागू पडेल अशा पद्धतीने रचला गेलेला आहे. चारी बाजू मोकळ्या असलेल्या बैठ्या घराची वास्तुशांती अगदी विधिवत पद्धतीने करता येते. पण अपार्टमेंटमधील सदनिका (फ्लॅट) असेल तर काही उपांगभूत कृती तारतम्यानेच कराव्या लागतात. वास्तुशांतिप्रयोगात अत्यावश्यक अशा ज्या अंगभूत कृती आहेत त्यामध्ये पुण्याहवाचन, देवता-ग्रह-अग्नी ह्यांची पूजा इत्यादींचा अंतर्भाव होतो. ही अंगे टाळता येत नाहीत. अर्थात, त्या कृती करताना कोणतीही तांत्रिक अडचण येत नसते. तथापि, वास्तुशांतीमधील वास्तुनिक्षेप (वास्तुप्रतिमा जमिनीत ठेवणे) हे अंग अत्यंत महत्त्वाचे असूनही फ्लॅटची वास्तुशांती करताना त्यासंदर्भात अनेक तांत्रिक अडचणी येतात. वास्तुप्रतिमेचा निक्षेप जमिनीत करावा तर जमिनीचा स्लॅब अत्यंत कमी जाडीचा असल्यामुळे तो फोडून त्यात गर्ता करणे हे तांत्रिकदृष्ट्या सर्वथैव अशक्य असते आणि जरी त्या दृष्टीने काही योजना केली तरी तसे करणे सयुक्तिक ठरत नाही. कारण वरच्या मजल्यावरील स्लॅबमध्ये निक्षेप केलेली वास्तुप्रतिमा खालील मजल्याच्या माथ्यावर आलेली असते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे वास्तुपुरुषाची दृष्टी खालच्या बाजूस असणाऱ्या सदनिकांकडे असते. अशा परिस्थितीत वास्तुप्रतिमेचा निक्षेप कसा करावा अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ह्या समस्येवर उपाय म्हणून काही ठिकाणी वास्तुप्रतिमा एका वस्त्रात बांधून ते वस्त्र छताच्या कडीला अडकवून किंवा पोटमाळ्यावर ठेवतात. पण ती वास्तुप्रतिमा जमिनीखाली स्थिर स्वरूपात असेल तरच तिच्या माध्यमातून वास्तुदेवतेचे अधिष्ठान त्या वास्तूमध्ये राहते, अन्य कोणत्याही प्रकारे नव्हे. म्हणून वास्तुनिक्षेप करणे हा अनिवार्य पक्ष ठरतो. ह्याबाबतीत मध्यम मार्ग म्हणजे ज्या कोपऱ्यात वास्तुनिक्षेप करावयाचा त्या कोपऱ्यातील भिंत थोडीशी पोखरून नंतर आतील बाजूस उंबराची पेटी बसेल एवढी जागा उकरावी व तेथे वास्तुनिक्षेप करावा. त्यामुळे आपोआपच ती वास्तुप्रतिमा खालील मजल्यावर असणाऱ्या सदनिकेच्या भिंतीवर (बीमवर) येईल. जर ह्या कोपऱ्यात कॉलम असेल तर उत्तमच. कारण संबंधित सदनिका कोणत्याही मजल्यावर असली तरी कॉलम हा थेट जमिनीच्या खाली गेलेला असतो. त्यामुळे कॉलमच्या थोड्याफार आतील बाजूस वास्तूप्रतिमेचा निक्षेप झाला तरी तो निक्षेप एका अर्थाने भूमीत झाल्यासारखा असतो.

सदनिकेच्या वास्तुशांतिप्रयोगात अडचणीचे ठरणारे आणखी एक उपांग म्हणजे ‘सूत्रवेष्टन'. सूत्रवेष्टनामुळे क्षेत्रनिर्धारण होत असते. सूत्रवेष्टन म्हणजे एका अर्थाने वास्तुदेवतेचे कार्यक्षेत्रच होय. अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या भिंती सामाईक असल्यामुळे अशा वास्तूस सूत्रवेष्टन करणे ही एक समस्याच असते. अर्थात, सूत्रवेष्टन हे अत्यावश्यक अंग नसून वास्तूची परिमिती निर्धारित करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. खरेतर राधे

त.

वन,

• फ्लॅटच्या बांधकामास प्रारंभ होतानाच परिमितीनिर्धारण होऊन ते सर्वमान्य असल्यामुळे

1 केले नाही तरी चालू शकेल. तथापि, सूत्रवेष्टन करताना वास्तूच्या बाहेरील

पुन्हा

1 सूत्रवेष्टन

सूत्रवेष्टन

• बाजूने जेवढे शक्य होईल तेवढे सूत्र बांधून घ्यावे. जेथे वास्तूच्या बाहेरील बाजूस सूत्रवेष्टन येत नाही तेथे ते आतील बाजूने करून घ्यावे. शक्य असेल तर शौचालय टाळून करावे. दुसरे म्हणजे, क्षेत्रनिर्धारण करताना वास्तूच्या सभोवती आठ दिशांना • जमिनीत खिळे ठोकून त्या-त्या ठिकाणी दहीभाताचा द्रोण ठेवावयाचा असतो. परंतु • सांप्रतकाळी फ्लॅटची वास्तुशांती करताना असे करणे शक्य होत नसल्यामुळे त्याऐवजी आपला फ्लॅट असलेल्या भागातील गच्चीच्या कठड्यांना आठ दिशांना खिळे मारून • त्यांच्या आधारे सूत्रवेष्टन करता येईल. तसेच त्या ठिकाणी दहीभाताचा द्रोण ठेवता येईल. फ्लॅटची वास्तुशांती करताना गृहप्रवेशापूर्वी गृहप्रदक्षिणा करणे शक्य होत नाही. त्यामुळे गृहप्रवेश करण्यापूर्वी यजमानाने बाहेर उभे राहून फार तर स्वतःभोवती प्रदक्षिणा करावी. अर्थात, स्वप्रदक्षिणा करण्याचीदेखील आवश्यकता नाही. पण जेथे देवाभोवती प्रदक्षिणा करणे शक्य नसते तेथे स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्याचा संस्कार मनावर अनेक पिढ्यांपासून रुजलेला असल्यामुळे स्वप्रदक्षिणा केली तरी चालते.

फ्लॅटची वास्तुशांती करताना उद्भवणारी नेहमीची समस्या म्हणजे होमहवनाच्या धुरामुळे फ्लॅटच्या भिंतींचा रंग खराब होतो अशी समजूत आहे. अर्थात, ह्या समजुतीत थोडे तथ्यही असते. होमहवनाच्या धुरामुळे भिंतींची चकाकी थोडी कमी होते. पण यजमान आणि पुरोहित ह्या दोघांनी ठरवले तर त्यातून मार्ग निघू शकतो. यजमानाने फ्लॅटचे रंगकाम होण्यापूर्वी वास्तुशांती केल्यास वरील समस्या उद्भवत नाही. पण काही वेळा फ्लॅट ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत अडचणी आल्यामुळे पूर्ण रंगकाम झालेला फ्लॅटच ताब्यात घ्यावा लागतो. अशा वेळी पुरोहितांनी मनावर घेतले तर कमीत कमी प्रदूषण करणारे व कमीत कमी धूर निर्माण करणारे इंधन वापरून धूर टाळता येतो. ग्रहयज्ञासाठी यज्ञीय वृक्षाच्या वाळलेल्या समिधा घेतल्यास व चरूऐवजी तांदूळ वापरल्यास धुराचा प्रश्न उद्भवत नाही. याज्ञिकाच्या खाचाखोचा माहीत असलेले पुरोहित व शिस्तप्रिय यजमान ह्यांनी परस्परांच्या साहचर्याने केलेली वास्तुशांती अत्यंत आदर्श व स्पृहणीय ठरते.

13 views0 comments

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
 • Blogger
 • Tumblr
 • TikTok
 • Snapchat
 • Pinterest
 • Telegram
 • Gmail-logo
 • Instagram
 • facebook
 • twitter
 • linkedin
 • youtube
 • generic-social-link
 • generic-social-link

Join us on mobile!

Download the “PANDITJIPUNE” app to easily stay updated on the go.